शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरण घेणार मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 17:53 IST

अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही अशा कृषीपंप ग्राहकांना तात्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े वीज बिल दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देयेत्या १ जानेवारीपासून या मेळाव्यांची व्याप्तीे वाढविण्यात येणार आहे.या मेळाव्यात तक्रारींची खातरजमा करून सुधारीत बिल जागेवरच देण्यात येणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, वीज बिलांच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीज बिल भरलेले नाही अशा कृषीपंप ग्राहकांना तात्काळ जागेवरच वीजबिल दुरुस्ती करुन देण्यासाठी महावितरणतर्फ़े वीज बिल दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत. येत्या १ जानेवारीपासून या मेळाव्यांची व्याप्तीे वाढविण्यात येणार आहे.महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाºया कृषीपंप धारकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरीत होण्याच्या दृष्टीने तक्रार असलेल्या बिलाची प्रत किंवा ग्राहक क्रमांक व मीटरवरील चालू रिडींगची नोंद सोबत आणण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. या मेळाव्यात तक्रारींची खातरजमा करून सुधारीत बिल जागेवरच देण्यात येणार आहे.महावितरणच्या विविध उपविभागिय कार्यालयांत या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ मध्ये तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा करून सहभागी झालेल्या कृषीपंप ग्राहकांने वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज केला असेल तर त्याचा वीजपुरवठा योजनेतील तरतुदींप्रमाणे पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत खंडीत करण्यात येऊ नये. मात्र ज्या ग्राहकांनी सवलतीच्या दराने सुद्धा तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला नसेल अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा अशासुचनाही महावितरणतर्फे संबंधितांना देण्यात आल्या आहेत.वीज बिलांची दुरुस्ती करीत असताना ग्राहकाचा मंजूर आणि जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वीज वापराची नोंद, वाहिनीवरील वीज वापराचा निदेर्शांक, वीज वापराचे तास आदी बाबी संबंधित उपविभागीय कार्यालयांनी विचारात घ्याव्यात, याशिवाय संबंधित कार्यकारी अभियंता यांनी रोहीत्रावरील सर्व कृषीपंप धारकांनी थकीत वीज देयकातील तीन हजार अथवा पाच हजार रुपयांचा भरणा केला असल्यास सदर नादुरुस्त रोहीत्र तीन दिवसाच्या आत अग्रक्रमाने बदलून देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत पहिला हप्ता व त्यानंतरच्या सर्व हप्त्यांचा भरणा करण्याच्या मुळ मूदतीत तीन महिने वाढही देण्यात आली आहे.कृषीपंप ग्राहकांनी आपल्या वीजबिलांत आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेत मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola cityअकोला शहर