शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारात वीज ‘मीटर’

By admin | Updated: May 20, 2017 01:21 IST

अकोला: महावितरणचा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महावितरणचा कारभार प्रचंड ढेपाळला असून, पैसे भरूनही लोकांना वीजपुरवठा मिळत नाही. काही ठिकाणी तर ग्राहकांच्या घरी केवळ विद्युत मीटर आणून ठेवले जातात. महावितरणचा हा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला. बाळापूर तालुक्यातील कळंबा येथील सुभाष उगले हे चक्क हातात विद्युत मीटर घेऊन आले व आपल्याला आतापर्यंत विद्युत पुरवठा मिळाला नसल्याची तक्रार ऊर्जामंत्र्यांकडे केली. दारिद्र्यरेषेखालील योजनेंतर्गत आपल्याला वीज जोडणी मंजूर झालेली असतानाही वीज कर्मचारी जोडणी करून देण्यास तयार नसून, केवळ विद्युत मीटर घरात आणून ठेवल्याचे उगले यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर गावात आणखी १५ जणांच्या घरात असे मीटर ठेवलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहून ऊर्जामंत्री चकित झाले. त्यानंतर संबंधित उपकेंद्राचा कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना मंचावर बोलावून सदर वीज ग्राहकाच्या हस्ते त्यांना हे मीटर बक्षीस म्हणून देण्यास सांगितले. यावेळी महावितरणचे अधिकारी चांगलेच खजील झाले. सायंकाळपर्यंत सुभाष उगले व इतरांना वीजपुरवठा जोडून देण्याचे आदेश यावेळी ऊर्जामंत्र्यांनी दिले.अधिकाऱ्यांची संपत्ती तपासा!सरकारकडून पगार व इतर सुविधा घेतल्यानंतरही महावितरणचे अनेक अधिकारी लोकांची कामे करीत नाहीत. जनतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. महावितरणच्या काही अभियंत्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे असल्याच्या तक्रारी असून, त्याबाबतचे पुरावेही आहेत. अनेक बडे अधिकारी काही दिवसांत श्रीमंत झाले आहेत. आर्थिक-देवाण-घेवाणीशिवाय हे शक्य नसल्यामुळे येत्या काही दिवसांत महावितरणच्या विदर्भातील सर्वच अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेशच यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपासून ते सहायक व कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतच्या सर्वांच्या संपत्तीच्या नोंदी तपासा व त्याबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करा, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.