शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज अभियंत्यास लाच घेताना पकडले

By admin | Updated: October 7, 2015 01:57 IST

चार हजाराची लाच स्वीकारली ; नवीन विद्युत मीटर घेण्यासाठी मागणी.

बुलडाणा : नवीन वीज मीटर घेण्यासाठी लाचेच्या रकमेपैकी उर्वरित राहिलेले चार हजार रुपये स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा आठवडी बाजारातील भाजीपाला अडत दुकानदार विजय रामप्रसाद पातालबन्सी (वय ३७) रा.परदेशीपुरा यांनी ५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, पत्नीच्या नावे नवीन विद्युत मीटर घेण्यासाठी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत मधुकर अंबाडकर (वय ४४) यांनी ५ हजार १४६ शासकीय शुल्काव्यतिरिक्त ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी नवीन विद्युत मीटरच्या प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी ३ हजार रूपये स्वीकारले व उर्वरित ४ हजार रूपये ६ ऑक्टोबर रोजी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ ऑक्टोबर रोजी चिखली रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यास त्याच्या कक्षामध्ये पंचासमक्ष लाचेच्या रकमेपैकी उर्वरित ४ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी लाचेची रक्कम जप्त करून आरोपी अंबाडकर विरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक एस.एल.मुंडे, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक व्ही.आर.पाटील, पो.नि.भाईक, पो.नि.खंडारे, ए.एस. आय.भांगे, पोहेकाँ शेगोकार, नेवरे, पो.ना.गडाख, चोपडे, जवंजाळ, ठाकरे, शेळके, ढोकणे, पोकाँ सोळंके, यादव, वारूळे यांनी सहभाग घेतला.