शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत जोडण्यांच्या घोळाची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:56 IST

एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश अहवाल मागविलाप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागांमध्ये विद्युत मीटरचा तुटवडा असल्यामुळे नवीन  ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात कमालीची दिरंगाई होत अस ताना दुसरीकडे मात्र अनेक वीज ग्राहकांनी नियमांना डावलून  एकाच घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या घेतल्या  आहेत. एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता  येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी  ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत  गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी जिल्हाधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करून त्वरित  अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.सध्या नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने नवीन वीज  जोडणी घेण्यासाठी ग्राहकांना प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत आहे त. रीतसर अर्ज करून पैसे भरल्यानंतरही जोडणीसाठी अनेक  दिवस ‘वेटिंग’वर राहावे लागते. तांत्रिक बिघाड असलेले मीटर  बदलण्यासाठी अर्ज करणार्‍या ग्राहकांना तर तीन-तीन महिने  ‘वेटिंग’वर राहावे लागते. एकीकडे नवीन जोडण्यांसाठी रीतसर  अर्ज करणार्‍यांना ‘वेटिंग’वर ठेवणे, तर दुसरीकडे मात्र ‘अर्थ पूर्ण’ व्यवहार करणार्‍यांना एकापेक्षा अधिक जोडण्या देणे, असे  प्रकार सुरू आहेत. महावितरणच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या  नावावर एकापेक्षा अधिक घरगुती वीज मीटर घेता येत नाही.  वाणिज्यिक जोडण्या मात्र कितीही घेता येतात. एकाच घरात  एकापेक्षा अधिक वीज जोडण्या घ्यायच्या असतील, तर  त्यासाठी घराची विभागणी झालेली असणे गरजेचे आहे. महावि तरणच्या कर्मचार्‍यांच्या ‘मिलीभगत’ने अनेक वीज ग्राहकांनी  वीज वापराच्या कमी दराच्या ‘युनिट स्लॅब’चा फायदा मिळावा,  या हेतूने एकाच जागेवर एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडण्या  घेतल्या आहेत.