शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 02:23 IST

महावितरणची धडक मोहीम; नाईलाजास्तव करावी लागणार कारवाई.

अकोला, दि. ४- वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने संपूर्ण राज्यात धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांवर विशेष जोर देण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांवरही नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.पाणीपुरवठा योजना या ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येतात. या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजना नागरी सुविधांमध्ये मोडत असल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला शक्य होत नाही. तथापि, थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे ४ प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात कुचराई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांवरही वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ७ कोटींवरजिल्हय़ात एकूण ८९८ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेद्वारा चालविल्या जातात. या योजनांची वीज देयके राज्य शासनाच्या निधीतून भरल्या जातात. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांकडे २0१६ अखेरपर्यंंत जवळपास ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा करण्याबाबत महावितरणकडून शासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही वीज देयक न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नाईलाजास्तव खंडीत करावा लागणार असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले. अकोला परिमंडळातील तीन्ही जिल्हय़ात ही थकबाकी ५0 कोटी आहे.निर्माण होऊ शकते कृत्रिम पाणीटंचाईयावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जिल्हय़ातील जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच भूगर्भातील पाणीपातळीही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे आशादायक चित्र सध्या तरी आहे; परंतु थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांना जलाशयांमध्ये पाणी असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.