शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ३९८ ठिकाणी पकडल्या वीजचोर्‍या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:29 IST

अकोला :  वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या विशेष पथकाने गुरुवार, १0 ऑगस्ट रोजी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तब्बल ३९८ ठिकाणी आकस्मिक छापे मारून  ८ लाख ३३ हजार ५५६ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ४१ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे ३९८ जणाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमहावितरणची अकोल परिमंडळात कारवाई ८४ लाखांची वीजचोरी उघड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या विशेष पथकाने गुरुवार, १0 ऑगस्ट रोजी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तब्बल ३९८ ठिकाणी आकस्मिक छापे मारून  ८ लाख ३३ हजार ५५६ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ४१ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे ३९८ जणाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असताना वीजचोरीमुळे महावितरणला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या निदेर्शानुसार मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्यासह अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, विनोद बेथारीया व गुलाबराव कडाळे यांचेसह कार्यकारी अभियंते, अभियंते अधिकारी व जनमित्र मिळून जवळपास ७00 जणांचा या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होता. वीजमीटर मध्ये हस्तक्षेप करून व वीज तारांवर आकोडे टाकून थेट वीजचोरी केली जात होती अशांविरुद्ध् कारवाई करण्यात आली, यामध्ये अकोला मंडळामध्ये ९७, बुलडाणा मंडळ १६२, तर वाशिम मंडळामध्ये ६८ अशी एकूण अकोला परिमंडळामध्ये ३९८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांनी जवळपास ८ लाख ३३ हजार ५५६ युनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ४१ हजार रुपयांची चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आले यातील अकोला मंडळामध्ये २६, बुलडाणा मंडळ ३६, तर वाशिम मंडळामध्ये ९ याप्रमाणे अकोला परिमंडळामधे एकून ७१ ठिकाणी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यापूर्वी नुकत्याच अकोला परिमंडळामध्ये वीजचोरी विरुद्ध झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४५ व ४२ अशा एकूण ८७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामुहिकरित्या दरमहा आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.