शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरांकडून वर्षभरात २ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 29, 2015 02:06 IST

१६ प्रकरणात पावणे तीन लाखांच्या दंडांची आकारणी

दादाराव गायकवाड/ कारंजा (वाशिम): जिल्ह्यात वीज चोरीला आळा घालण्याकरिता महावितरणच्या वतीने एप्रिल गत नऊ महिन्यात १६ प्रकरणांमध्ये २ लाख ७१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गत काही वर्षांपासून वीज चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वीज वितरणकडून भरारी पथकही नियुक्त करण्यात आलेले असून, जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागात हे पथक वीज चोरी पकडून वीज चोरट्यांना तत्काळ दंड आकारण्याची कारवाई करीत आहे. याशिवाय वीज चोरी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हय़ात महावितरणने एप्रिल २0१५ ते आजपर्यंत १६ प्रकरणांमध्ये २ लाख ७१ हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली आहे. त्यापैकी १३ प्रकरणांत २ दोन लाख २ हजारांचा दंड वसूल केला आहे. सदर कारवाई ही केवळ जिल्ह्यांतर्गत कार्यरत उपविभागांकडून करण्यात आलेली असून, यामध्ये भरारी पथकाच्या कारवाईचा समावेश नाही. वाढत्या वीज चोरीमुळे दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रकार वारंवार घडत असून, त्याचा फटका मात्र नियमित वीज बिल भरणा करणार्‍या वीज ग्राहकांना भोगावा लागतो. विजेच्या खांबावरील तारांवर थेट आकोडे टाकून विजेचा वापर करण्यासोबतच विजेचे मीटर वेगळे करून थेट विजेचा वापर करणे, इतर एखाद्या वस्तूचा आधार घेऊन विजेच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे आदी प्रकारे वीज चोरी केली जाते. काही ठिकाणी तर घरगुती वापराच्या नावे घेतलेल्या वीज जोडणीवर व्यावसायिक कामे केली जातात. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी वीज वितरणकडून वेगवेगळे दर निश्‍चित करण्यात आलेले आहेत; मात्र अनेक जण घरगुती कारणासाठी वीज घेऊन व्यावसायिकसाठी त्याचा वापर करतात. या वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.