शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

विद्युत भवनातील लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: June 2, 2017 19:37 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवन इमारतीमधील लिफ्ट गत दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवन इमारतीमधील लिफ्ट गत दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, गत दोन वर्षांपासून लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक रतनलाल प्लॉट भागात विद्युत भवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय आहे, तसेच महापारेषणचे कार्यालयही याच इमारतीत आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांचे मुख्यालय असल्याने या इमारतीमधील कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, महापारेषणचे अधीक्षक अभियंता, महावितरणच्या अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता यांची कार्यालये या इमारतीत आहेत. सदर इमारतीत वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा आहे; परंतु ती गत दोन वर्षांपासून नादुरुस्तच आहे. त्यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पायऱ्या चढून वरच्या मजल्यांवर जावे लागते. सुविधेसाठी असलेली लिफ्ट नादुरुस्त झाली असली, तरी प्रशासन मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.