अकोला: जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) सदस्य पदांसाठी जिल्हा परिषद सदस्यांमधून १५ सदस्यांची निवड करण्यासाठी लवकरच (महिनाभरात) निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांची मतदार यादी जिल्हा परिषदेत जाहीर करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद मतदारसंघातून १५ सदस्यांची निवड करावयाची आहे; मात्र गेल्या वर्षभरात लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया रखडली. अखेर ही निवडणूक घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ सदस्यांची मतदार यादी ६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली असून, या यादीवर शुक्रवार, ९ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. अंतिम मतदार यादी १२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
‘डीपीसी’वर जिल्हा परिषद सदस्यांसाठी लवकरच निवडणूक
By admin | Updated: January 8, 2015 00:46 IST