लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये एकलारा सरपंच पदासाठी उज्ज्वला सांगळे आणि काटी-पाटी सरपंच पदासाठी सुनील पाटकर विजयी झाले.जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये पाच वर्षांची मुदत संपणार्या अकोला तालुक्यातील एकलारा आणि काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यानंतर बुधवार, २७ डिसेंबर रोजी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात मतमोजणी करण्यात आली असून, निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये एकलारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी उज्ज्वला बबनराव सांगळे विजयी झाल्या, तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी वर्षा विलास सांगळे, शोभा दीपक बांगर, रामदास ज्ञानेश्वर मंडळे विजयी झाले. तसेच रामेश्वर श्रीराम गडमने, ललिता बाळकृष्ण वानखडे, प्रकाश हिरामण वानखडे व आम्रपाली मंगेश वानखडे इत्यादी चार उमेदवार अविरोध विजयी झाले.तसेच काटी-पाटी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात सरपंच पदासाठी सुनील केशवराव पाटकर विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सत्यदेव सखाराम चर्हाटे, सुकेशनी प्रदीप दामोदर विजयी झाल्या असून, वैशाली विजय गवई अविरोध विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी संजय मोरे यांनी काम पाहिले. त्यांना किसन चेचरे व प्रकाश बुटे यांनी सहकार्य केले.
अकोला तालुक्यातील एकलारा, काटी-पाटी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:54 IST
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये एकलारा सरपंच पदासाठी उज्ज्वला सांगळे आणि काटी-पाटी सरपंच पदासाठी सुनील पाटकर विजयी झाले.
अकोला तालुक्यातील एकलारा, काटी-पाटी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर
ठळक मुद्देसरपंच पदासाठी उज्ज्वला सांगळे, सुनील पाटकर विजयी