वाशिम : जिल्ह्यातील वाशिमसह कारंजा व मंगरूळपीर येथील नगराध्यक्षपदांची निवडणूक १४ जुलै रोजी होणार आहे. नगर पालिका प्रशासन विभागाने ५ जुलैला याबाबतचे आदेश पारित केले असुन यंत्रणा कामाला लागली आहे.वाशिम व कारंजा येथील नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २८ जुनला तर मंगरूळपीरच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ ३0 जूनला संपुष्ठात येणार होता. तत्पूर्ती शासनाने १0 जूनला अध्यादेश काढून नगराध्यक्षांच्यापदांना मुदतवाढ दिली होती. दरम्यान २ जुलै रोजी शासनाने आपलाच निर्णय फिरविला होता. सरकारच्या अध्यादेशानुसार ५ जुलैला नगराध्यक्षांचा कार्यकाल संपला असुन नगर पालिका प्रशासन विभागाने तिन्ही नगराध्यक्षांना कार्यमुक्त केले आहे. सद्या प्रशासकीय अधिकार्यांकडे या पदांचा प्रभार सोपविण्यात आला असुन १४ जुलैला तिन्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणूका आयोजित केल्या आहेत.
१४ जुलैला नगराध्यक्षांची निवडणूक
By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST