शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये दिवळीपूर्वीच फुटणार फटाके; सभापती उपसभापतीपदांची १६ ऑक्टोबरला निवडणूक!

By संतोष येलकर | Updated: October 12, 2022 20:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली नोटीस: विशेष सभांमध्ये होणार निवड

अकोला: जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांच्या विशेष सभा घेण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बुधवारी काढली असून या विशेष सभांमध्ये पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे दिवळीपूर्वीच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये राजकीय फटाके फुटणार आहेत.

जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची अडीच वर्षांच्या कालावधीची मुदत संपली असून, पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती पदांची निवड करण्याकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती  पदांच्या निवडणुकीसाठी  १६ ऑक्टोबर रोजी पंचायत समित्यांच्या विशेष सभा आयोजित करण्यात येत असल्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी काढली आहे.

पंचायत समित्यांच्या या विशेष सभांमध्ये पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापतीं  पदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात  येणार असून, विशेष सभांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नेमनुकही  करण्यात आली आहे. सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीमुळे दिवळीपूर्वीच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये फटाके फुटणार आहेत.सभापती पदांच्या आरक्षणाची आज सोडत!जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत गुरुवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबतची उत्कंठा आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकAkolaअकोला