शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त १६ सरपंचपदांची ८ एप्रिलला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत रिक्त असलेल्या १६ सरपंचपदांचे आरक्षण नव्याने जाहीर करण्यात आले असून, आरक्षणानुसार सरपंचांची निवड करण्यासाठी ...

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत रिक्त असलेल्या १६ सरपंचपदांचे आरक्षण नव्याने जाहीर करण्यात आले असून, आरक्षणानुसार सरपंचांची निवड करण्यासाठी सरपंचपदांची ८ एप्रिल रोजी निवडणूक घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी तहसीलदारांना दिला. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या पहिल्या विशेष सभेत सरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ९ व ११ फेब्रुवारी रोजी सरपंच आणि उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सरपंचपदांच्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने, अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १३ असे एकूण १६ सरपंचपदे राहिली. त्यामुळे रिक्त सरपंचपदांचे आरक्षण नव्याने १६ मार्च रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर आरक्षण सोडतीनुसार रिक्त असलेल्या तेल्हारा, अकोट, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी व पातूर या सहा तालुक्यातील १६ सरपंचपदांची निवडणूक ८ एप्रिल रोजी घेण्याचा आदेश ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिला. त्यानुसार संबंधित १६ ग्रामपंचायतींच्या पहिल्या विशेष सभेत सरपंच पदांची निवडणूक घेण्यात येणार आहे.

‘या’ ग्रामपंचायतींच्या सरपंच

पदांची होणार निवडणूक !

तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी, सौंदळा, वांगरगाव, अकोट तालुक्यातील चोहोट्टा, सावरा, मक्रमपूर, मंचनपूर, पातोंडा, अकोला तालुक्यातील खांबोरा, बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, बार्शिटाकळी तालुक्यातील लोहगड व पातूर तालुक्यातील चरणगाव, दिग्रस खुर्द, आलेगाव, विवरा व चतारी इत्यादी १६ ग्रामपंचायतींच्या रिक्त सरपंचपदांची निवडणूक घेण्यात येणार आहे.

अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक !

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील रिक्त १६ सरपंचपदांच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या विशेष सभा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्याआनुषंगाने ग्रामपंचायतींच्या विशेष सभांचे अध्यासी अधिकारी म्हणून १६ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक व विस्तार अधिकारी इत्यादी संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.