शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांच्या निवडणुकीत १४ सरपंचांची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST

अकोला: जिल्हयातील रिक्त १६ सरपंच पदांची निवडणूक गुरुवार, ८ एप्रिल रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सात सरपंचांची अविरोध निवड करण्यात ...

अकोला: जिल्हयातील रिक्त १६ सरपंच पदांची निवडणूक गुरुवार, ८ एप्रिल रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सात सरपंचांची अविरोध निवड करण्यात आली असून, सात सरपंच पदांसाठी मतदान घेण्यात आले. उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नसल्याने एक सरपंचपद रिक्त राहिले असून, कोरमअभावी ग्रामपंचायतची विशेष सभा तहकूब करण्यात आल्याने एक सरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गत ९ व ११ फेब्रुवारी रोजी सरपंच पदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये आरक्षणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे सदस्य निवडून आले नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यात १६ सरपंचांची पदे रिक्त राहिली होती. त्यामुळे रिक्त सरपंच पदांसाठी १६ मार्च रोजी नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार रिक्त १६ सरपंच पदांची निवडणूक ८ एप्रिल रोजी घेण्यात आली. संबंधित ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये सरपंचपदांची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सात सरपंचांची अविरोध निवड करण्यात आली असून, सात सरपंचांची निवड मतदानाव्दारे करण्यात आली. उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नसल्याने एक सरपंचपद रिक्त राहिले असून, सदस्यांच्या गणपूर्तीअभावी ग्रामपंचायतची विशेष सभा तहकूब करण्यात आल्याने एक सरपंच पदासाठी ९ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.

अविरोध निवड झालेले असे आहेत सात सरपंच!

तालुका ग्रा.पं. सरपंच

तेल्हारा चांगलवाडी कासुबाइ शिवणकार

तेल्हारा सौंदळा नवलकुमार अरबट

तेल्हारा वांगरगाव वैशाली मार्के

अकोट पातोंडा विनोद सोळंके

अकोला खांबोरा माधुरी इंगळे

बार्शिटाकळी लोहगड ताइ धाडसे

पातूर विवरा मंगला देठे

मतदानाव्दारे निवड झालेले असे आहेत सात सरपंच!

तालुका ग्रा.पं. सरपंच

अकोट सावरा स्वाती मोरे

अकोट मक्रमपूर संतोष हिवरे

अकोट मंचनपूर निर्मला चौधरी

बाळापूर अंत्री मलकापूर संदीप वाघोळे

पातूर चरणगांव सुमित्रा वसतकार

पातूर दिग्रस खुर्द शशिकला महल्ले

पातूर आलेगाव गोपाल महल्ल

उमेदवारीे अर्जच नाही;

चोहोट्टा सरपंच पद रिक्त!

सरपंच पदांच्या निवडणूकीत अकोट तालुक्यातील चोहोट्टा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथील सरपंच पद रिक्त राहिले आहे.

चतारी येथे कोरमअभावी सभा

तहकूब; आज सरपंचांची निवड!

पातूर तालुक्यातील चतारी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत विशेष सभेला सदस्यांची गणपूर्ती (कोरम) पूर्ण झाली नसल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे येथील सरपंच पदाची निवडणूक होऊ शकली नाही. शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचातच्या विशेष सभेत सरपंचांची निवड होणार आहे.