शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२६७ गावांत 'एक गाव - एक गणपती'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST

सण-उत्सवांदरम्यान सामाजिक सलोखा राहून गावातील ऐक्य कायम राहावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. एकापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये ...

सण-उत्सवांदरम्यान सामाजिक सलोखा राहून गावातील ऐक्य कायम राहावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. एकापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ निर्माण होऊन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रामीण भागात ‘एक गाव - एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येते. यंदा जिल्ह्यात एकूण १३३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली आहे. अकोला शहरासह तालुक्यांच्या शहरांमध्ये ५४८, तर ग्रामीण भागात ७८७ गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यांपैकी २६७ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची स्थापना झाली आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवावर नियम व अटींचे बंधन आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये एक गणपतीची स्थापना झाली आहे. विविध परवानग्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांनंतर भाविकांचा उत्साह कायम आहे. सर्व नियम व अटींचे पालन करून बाप्पांचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.

बाप्पांच्या घरगुती प्रतिष्ठापनेवर भर

गतवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये म्हणून शासनाकडून नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे गतवर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी झाली आहे. घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यावर भर आहे. त्यामुळे घरोघरी श्री विराजमान झाल्याचे चित्र आहे.