शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते क्रमांकात अडकली आठ कोटींची मदत

By admin | Updated: June 30, 2014 01:52 IST

अकोला जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा.

अकोला : गारपिटीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या ५७ कोटीपैकी ४९ कोटींची मदत वाटप करण्यात आली असली तरी, उर्वरित ८ कोटींच्या मदत वाटपाचे काम बाकी आहे. संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने या मदतीचे वाटप अडकले आहे. मदती पासून वंचित असलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून या मदतीची प्रतीक्षा केली जा त आहे.गेल्या २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्हय़ात हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, संत्रा, लिंबू व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ५0 टक्क्याच्यावर पिकांचे नुकसान झालेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य शासनामार्फत मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत जिल्हय़ातील पीक नुकसान भर पाईपोटी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत गेल्या मार्चअखेर ५७ कोटींचा मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्हय़ातील सातही तहसीलस्तरावर वितरित करण्यात आलेल्या मदतनिधीतून, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्यानुसार सातही तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम करण्यात आले. त्यामध्ये एकूण ५७ कोटींच्या मदतनिधीपैकी गेल्या दोन महिन्यात ४९ कोटींची मदत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित ८ कोटींची मदत वाटप करणे अद्याप बाकी असल्याची स्थिती आहे. संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक तलाठी आणि तहसील कार्यालयाकडे उपलब्ध झाले नसल्याने, मदतीची रक्कम उपलब्ध असूनही, मद तीची रक्कम गारपीटग्रस्त संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात करण्यात आली नाही. परिणामी बँक खाते क्रमांकात जिल्हय़ात गारपीटग्रस्त शे तकर्‍यांना ८ कोटींची मदत अडकली आहे. या प्रकारात मात्र मदतीच्या लाभा पासून वंचित असलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून गारपिटीची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उपलब्ध झालेल्या ५७ कोटींच्या मदतनिधीपैकी ४९ कोटींची मदत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहीती दिली. काही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने, उर्वरित आठ कोटींची मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयाकडे द्यावा अशी सुचना त्यांनी केली. **शेतकर्‍यांच्या याद्या चावडीवर लावण्याच्या सूचना!गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीमध्ये नाव आहे; मात्र बँक खाते क्रमांक नमूद नाही, अशा गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या ग्रामपंचायत चावडीवर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बँक खाते क्रमांक नसलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या सोमवारी लावण्यात येणार आहेत.