शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:09 IST

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली.

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. लोकांनी ाास सहन करीत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या मेहनतीचा पैसा बँका, पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्समधून बदलून घेतला. नोटबंदीनंतर उद्भवलेली स्थिती ५० दिवसांनंतर आटोक्यात येईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष झाले; पण अजूनही त्याची झळ अकोल्यात कायम आहे. नोटाबंदीमुळे अकोल्यातील अनेक उद्योजकांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. यातून काही सावरले; मात्र काही व्यापारी-उद्योजक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही.नोटाबंदीनंतर समाजात आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अपेक्षा सरकारला होती; मात्र तसे झाले नाही. अनेकांनी टीका केली. काहींनी तर नोटाबंदीला काही विशिष्ट लोकांचा अजेंटा म्हटले. हे सर्व होत असले तरी सर्वसामान्य जनता आणि आणि व्यापारी उद्योजकांना या नोटाबंदीने काय दिले, हे जाणून घेतले आहे लोकमतने काही क्षेत्रातील गणमान्य व्यापाऱ्यांकडून. 

नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारावर प्रतिबंध लागले आहे. त्यामुळे प्रापर्टीत होणारी मोठी उलाढाल थांबली आहे. जंगम मालमत्ता घेताना होणारा व्यवहार आधी दिसत नव्हता; मात्र नोटाबंदीनंतर आणि जीएसटी लावल्याने अनेक व्यवहार दाखविणे क्रमप्राप्त झाले आहे. सोन्याची खरेदीही पूर्वीप्रमाणे कुणी करीत नाही. त्यामुळे नोटाबंदीची झळ ही कायम राहणार आहेच. कारण सर्व बदलत आहे, वेळ लागेल.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.- नोटाबंदी ज्या उद्देशाने सुरू झाली होती, ते उद्देश आता मागे पडले आहे. पूर्वी ५ टक्के लोक पेट्रोल पंपावरून आॅनलाइन व्यवहार करायचे. नोटाबंदीनंतर सहा महिने पॉज मशीनने आर्थिक व्यवहार केले. त्यामुळे ही टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र दोन वर्षांनंतर जर मागोवा घेतला तर आता केवळ २० टक्के लोक स्वाइप कार्ड वापरतात. याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे.- राहुल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असो. अकोला.- लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नोटाबंदीचा फायदा काय झाला हा विषय संशोधनाचा आहे; मात्र लोक आता आॅनलाइन व्यवहार करू लागले आहे. पूर्वीप्रमाणे कॅशचे व्यवहार लोक सहज करीत नाही. शासनाचा धाक निर्माण झाला आहे.- कमल आलिमचंदानी, उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDemonetisationनिश्चलनीकरण