शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव अग्रसेन पतसंस्थेच्या संचालकांना शिक्षा

By admin | Updated: April 11, 2017 00:20 IST

न्यायालयात खोटे कागदपत्र दाखल केल्याचे सिद्ध; एक महिना सश्रम कारावास व दंड

खामगाव : न्यायालयात खोटे कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने शेगाव अग्रसेन सहकारी पतसंस्था र्मयादित शेगाव शहर शाखा खामगाव येथील व्यवस्थापक व ११ संचालकांना एक महिना सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा १0 एप्रिल रोजी सुनावली. या संचालकांमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापार्‍यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.शहरातील भुसारा गल्ली भागातील रहिवासी अशोक श्यामसुंदर झुनझुनवाला यांनी शेगाव श्री अग्रसेन सहकारी पतसंस्था शेगावच्या खामगाव शाखेकडून वाहन कर्ज घेतले होते. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने सदर वाहन पतसंस्थेने जप्त केले होते. यानंतर २00५ मध्ये तीन वेळा सदर कर्जदाराचे कर्जाऊ वाहनाचे हर्रासीबाबत जाहिरात लाउडस्पिकरद्वारे पतसंस्थेच्यावतीने देण्यात आली होती. लाउडस्पिकरद्वारे वाहन हर्रासीची सूचना देत मानहानी झाल्याप्रकरणी अशोक झुनझुनवाला यांनी येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात लाउडस्पिकर फिरविण्यासाठी पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात आल्याचा जबाब पतसंस्थेकडून न्यायालयात देण्यात आला होता. परवानगीची प्रत सादर करण्यात आली होती. दरम्यान, अशोक झुनझुनवाला यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात २00५ मध्ये लाउडस्पिकर फिरविण्याच्या परवानगीचे अधिकार त्यावेळी पोलीस स्टेशनला होते का? याबाबत माहिती मागितली असता, २00६ पासून लाउडस्पिकरची परवानगी देण्याचे अधिकार ठाणेदारांना देण्यात आले आहेत; मात्र त्याआधी हे अधिकार पोलीस स्टेशन अधिकार्‍यांना नव्हती, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अशोक झुनझुनवाला यांना देण्यात आली. त्यामुळे अग्रसेन पतसंस्थेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या परवानगीबाबत प्रश्न उपस्थित करीत, न्यायालयात सादर केलेली परवानगी प्रत बनावट असल्याचे झुनझुनवाला यांच्या वकिलांनी सिद्ध केले. त्यामुळे अग्रसेन पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्याने, भारतीय दंड विधानच्या कलम ४७१ नुसार एक महिना सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. हा निकाल येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश ए.जी. म्हसके यांनी दिला. दोषी ठरविण्यात आलेल्या संचालकांमध्ये प्रमोद राधेश्याम अग्रवाल, शिवप्रसाद श्रीनिवास पाडिया, विजयकुमार राजकुमार चौधरी, सागर रामेश्‍वर मोदी, जगदीश मदनलाल खेतान, जगदीश रतनलाल अग्रवाल, किशोर भाईलाल गणात्रा, राजेंद्र दीपचंद बडजात्या, संजयकुमार प्रल्हादराय अग्रवाल, नरेंद्र हरनारायण करणानी, सचिन सुभाष बाफना, भगतसिंग भाऊलाल राजपूत आदींचा समावेश आहे. या निकालामुळे सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. याप्रकरणी तक्रारदार अशोक झुनझुनवाल यांच्यावतीने अँड.सी.आर. होतवाणी यांनी काम पाहिले. शिक्षा झालेल्यांमध्ये प्रतिष्ठितांचा समावेशयाप्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजकांचा समावेश आहे. या निकालामध्ये सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान निकालानंतर तत्कालीन संचालक व एका ज्येष्ठ संचालकांमध्ये वादसुद्धा निर्माण झाला होता.