शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची दिवाळी सुटी न वाढविण्यावर शिक्षणाधिकारी ठाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 12:21 IST

शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी पुढील शैक्षणिक नियोजन करूनच सुटी जाहीर केली आहे

अकोला: माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन २५ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळीची सुटी जाहीर केली आहे; परंतु शिक्षण समन्वय समितीने इतर जिल्ह्यांचे दाखले देत, शाळांच्या दिवाळी सुटीत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे; परंतु या मागणीला शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘खो’ दिला असून, शाळांची दिवाळी सुटी न वाढविण्यावर शिक्षणाधिकारी मुकुंद ठाम आहेत.राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने १३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ११ नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या सुटीची पत्रे सोशल मीडियावरील शिक्षकांच्या ग्रुपवर फिरत आहेत. या पत्रांचा आधार घेत, शिक्षण समन्वय समितीने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना निवेदन देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा विचार करता, ७ नोव्हेंबरपर्यंत सुटी वाढवून देण्याची मागणी केली होती. शिक्षणाधिकाºयांनी केवळ दहा दिवसच सुटी जाहीर केली. अनेक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. निवडणूक कामाचा ताण लक्षात घेता, शाळांच्या दिवाळी सुट्या वाढविण्याची मागणी शिक्षण समन्वय समितीने केली आहे; परंतु शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी पुढील शैक्षणिक नियोजन करूनच सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सुटी वाढविणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक