शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा विनयभंग करणाऱ्यास शिक्षा

By admin | Updated: April 6, 2017 01:22 IST

खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

अकोला : पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीच्या पत्नीने व मुलाने महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी या दोघांना अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली, तसेच तीनही आरोपींना २२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.खोपडी येथील रहिवासी ३५ वर्षीय महिला एकटी असल्याची संधी साधत रामराव मोतीराम ठाकरे याने महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला होता. महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच महिला घर सोडून पळून गेली होती. त्यानंतर थेट रामराव ठाकरे यांची पत्नी मनोरमा ठाकरे व मुलगा अनंता ठाकरे या दोघांना घडलेला प्रकार महिलेने सांगितला. यावर या दोघांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार महिलेने पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, २९४, ३४ आणि अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मी नांदेडकर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासल्यानंतर मोतीराम ठाकरे याला अ‍ॅट्रासिटी आणि विनयभंग प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा तसेच १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला तर त्याची पत्नी मनोरमा आणि मुलगा अनंता या दोघांना जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे तीन महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या २२ हजार रुपयांच्या रकमेतील २१ हजार रुपये दंड पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.