शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण शुल्क नियमन कायदा, पालकांना होत नाही फायदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:00 IST

पेड एज्युकेशन, कॉस्ट एज्युकेशनला प्रोत्साहन देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न शासनच करीत आहे.

अकोला: शाळांसाठी शुल्क नियमन कायदा, १४ वर्षांपर्यंत मुलांना सक्तीच्या व मोफत शिक्षणासाठी आरटीई कायदा करायचा आणि दुसरीकडे संस्थाचालकांच्या हिताचे विधेयक मंजूर करून पूर्व प्राथमिक शाळांना कायद्यातून वगळून शासन चक्क धूळफेक करीत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याऐवजी पेड एज्युकेशन, कॉस्ट एज्युकेशनला प्रोत्साहन देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न शासनच करीत आहे. शिक्षण शुल्क नियमन कायदा...पालकांना होत नाहीये फायदा...असेच म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या जिल्ह्यातील इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळांमध्ये नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. पाल्यांच्या प्रवेशासाठी पालक शाळांमध्ये चकरा घालत आहेत; परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशासाठी वाढविलेल्या भरमसाठ डोनेशनमुळे पालकांना धडकी भरली आहे. शासनाने शाळांच्या डोनेशनवाढीला कोणताही चाप न लावता, उलट पालकांच्या अधिकारांवरच गदा आणली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी यंदा तर डोनेशनची रक्कम दुपटीने वाढवून मनमानीच सुरू केली आहे. आपल्या पाल्याला शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. प्रवेशासाठी पालक शाळांकडे विनंती अर्जांसोबत प्रत्यक्ष भेटीसुद्धा घेत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढता ओढा लक्षात घेता, इंग्रजी शाळांनी कमाईचा गोरखधंदाच सुरू केला आहे. या शाळांकडून दरवर्षी ५0 हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पालकांकडून डोनेशन उकळल्या जाते. विविध फंडांच्या नावाखाली पालकांकडून पैसा घेतला जात आहे. यंदासुद्धा प्रवेशासाठी जिल्ह्यातील इंग्रजी शाळांनी डोनेशनचे दरच ठरविले आहेत. सांगितलेले डोनेशन भरत असाल तरच पाल्याला प्रवेश देण्यात येतो. नाही तर दुसरा उमेदवार तुमच्यापेक्षा अधिक पैसा देण्यास तयार आहे, असे सांगितले जाते. यंदासुद्धा तशीच परिस्थिती पालकांना अनुभवायला मिळत आहे. डोनेशन आणि शाळा शुल्क असे मिळून पालकांकडून लाखो रुपये या शाळांकडून उकळल्या जात आहेत. भरमसाठ डोनेशन व शुल्क घेतल्यानंतरही शाळांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात नाही. यावर नियंत्रणासाठी शासनाने २0११ मध्ये शिक्षण शुल्क नियमन कायदा केला; परंतु कायदा पालकांच्या नव्हे तर शाळांच्या बाजूने आहे. कायदाच कुचकामी ठरवून शासन शाळांचे हित साधत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. (प्रतिनिधी)

कायदा शिक्षणाच्या मुळावर!राज्य सरकारने 'महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियमन अधिनियम २०११' आणून शुल्क नियंत्रणाचा प्रयत्न केला; मात्र गतवर्षी कायद्यात सुधारणा केली असून, शुल्क न भरणाऱ्या पालकांकडून व्याजासह ते वसूल करण्याची तरतूद केली आहे; तसेच बेकायदा शुल्क वसुली केल्याबद्दल शाळांवर करण्यात येणाºया दंडात्मक कारवाईची तरतूद रद्द केली. त्यामुळे हा कायदा पालकांच्या आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावर आला आहे.अन्यायकारक तरतुदी७६ टक्के पालकांनी संमती दिल्यास शाळेस थेट शुल्कवाढ करण्यास परवानगी आहे. शुल्कवाढ रद्द करण्यास ७६ टक्के पालकांनी संमती दिली तरीही ती रद्द करण्याची तरतूद नाही. २५ टक्के पालकांच्या तक्रारीनंतरच विभागीय शुल्क नियंत्रण समिती कारवाईबाबत विचार करेल.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAkolaअकोला