शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींनी घेतला शिक्षण विभागाचा धांडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:57 IST

कर्मचारी गैरहजर: काहींचे अर्जही नाहीत; दौऱ्यांबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधिकारी दौऱ्यावर असताना सुरू असलेली बेबंदशाही सभापती पुंडलिकराव अरबट यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या अचानक भेटीतून उघड झाली. यावेळी चार कर्मचारी अर्ज नसतानाच गैरहजर, दौऱ्याची नोंद न करताच कार्यालयात अनुपस्थित असल्याचे पुढे आले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्रही त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. सभापती अरबट यांनी भेटीदरम्यान विविध मुद्यांची माहिती घेतली. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक उषा खेडकर अर्ज न देताच अनुपस्थित आढळल्या. दौऱ्याबाबतची नोंदही कुठेच नाही. कनिष्ठ सहायक गजानन पुंडकर यांची हजेरी पुस्तिकेत सही नाही, रजेचा अर्जही नव्हता. अधीक्षक गिरी २० मे पर्यंत रजेवर होत्या. सोमवारी रुजू होणे अपेक्षित असताना त्या आल्या नाहीत. सांख्यिकी विस्तार अधिकारी सुखदेवे यांचीही स्वाक्षरी नाही. दौऱ्यावर गेल्याची नोंदही नाही. विस्तार अधिकारी साजिया हक यांची २० मे रोजी दौऱ्यावर असल्याची नोंद आहे. मात्र, आज उपस्थित नव्हत्या. तसेच २३ मे रोजीचा दौरा नोंदलेला आहे. कनिष्ठ सहायक गावंडे यांचाही रजेचा अर्ज नाही, हजेरीपंजीत नोंद नाही. कनिष्ठ सहायक सारिका ठाकरे यांनी उषा खेडकर यांच्या हजेरीपंजीतील नावासमोर दौरा लिहून दिशाभूल केली आहे. या प्रकरणी संबंधितांची बिनपगारी सुटी करून चुकीचे दौरे लिहिणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची मागणी सभापती अरबट यांनी पत्रातून केली. शिक्षण विभागातील ३३५ देयके थकीतकनिष्ठ सहायक सारिका ठाकरे यांच्याकडे वैद्यकीय परिपूर्ती देयकांचा प्रभार आहे. त्यांच्याबाबत विविध शिक्षक संघटनांच्या तसेच शिक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडील देयकांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या कार्यरत झाल्यापासून ८५, तर त्यापूर्वीची २५० देयके प्रलंबित असल्याचे पुढे आले. देयक प्रलंबित असल्याची कारणे त्यांना सांगता आली नाहीत. हा गंभीर मुद्दाही उघड झाला आहे.