शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:50 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत.

 

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाºयावर आहे.शिक्षण समितीच्या १३ जुलै रोजी झालेल्या सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याबाबत चुकीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये अनियमितता करण्यात आली. त्यामुळे कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. सेवाज्येष्ठतेनुसार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संध्या कांगटे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याकडे प्रभार देणे आवश्यक होते; मात्र प्रभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला. तो काढून घ्यावा, चुकीचा प्रस्ताव सादर करणाºयांवर कारवाई करावी, असा ठराव १३ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत सदस्य संतोष वाकोडे यांना मांडला. ज्योत्स्ना चोरे यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावानुसार कार्यवाही करावी, असे पत्र शिक्षण सभापती पुंडलिक अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. त्यानुसार अवचार यांना कार्यमुक्त करत संध्या कांगटे यांना प्रभार देण्यात आला. त्यांनी दोन ते तीन दिवस काम पाहिल्यानंतर लगेच दीर्घ रजेवर गेल्या. त्यामुळे पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची मुदतही प्रशासनाला पाळता आली नाही. सेवाज्येष्ठता यादी अंतिम करणाºया समितीच्या अध्यक्षपदी कांगटे यांना जबाबदारी देण्यात आली होती. ती यादीही रखडली आहे. त्यातच शिक्षण विभागातील दैनंदिन कामकाजही प्रभावित झाले आहे. शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाºयावर सोडण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र