शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य तेल एक रुपयाने महागले; डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरल्याचा परिणाम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:44 IST

अकोला : आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याने देशभरातील खाद्य तेल एका रुपयाने महागले आहे.

ठळक मुद्देइंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, रशिया या देशातून भारताला सातत्याने खाद्य तेल विकत घ्यावे लागते. रुपयाची घसरण झाल्याने भारताला खाद्य तेल विकत घेताना जास्त रक्कम मोजावी लागत आहे.

- संजय खांडेकरअकोला : आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याने देशभरातील खाद्य तेल एका रुपयाने महागले आहे. खाद्य तेलाचे दर एका रुपयाने वाढल्याने पर्यायाने सर्वसामान्य माणसांच्या घरातील भाजी महाग झाली आहे.भारतातील १३० कोटी लोकांना दरवर्षी २०० लाख टनाच्या वर खाद्य तेल लागते. यापैकी ८० टक्के तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आयात होते, तर २० टक्के तेलाचे उत्पादन भारतात होते. पामतेल, रिफाईन, सोयाबीन, राइस तेल आणि सूर्यफूल तेल दरवर्षी विदेशातून येते. यूएसए, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, रशिया या देशातून भारताला सातत्याने खाद्य तेल विकत घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारताला खाद्य तेल विकत घेताना जास्त रक्कम मोजावी लागत आहे. मंगळवारी ही घसरण कायम राहिली. डॉलर्सची किंमत भारतीय मुद्रेत ७१.५० पैसे झाली. त्यामुळे देशभरात पामतेल, रिफाईन, सोयाबीन, राइस तेल आणि सूर्यफूल तेल खाद्य तेलाचे दर एक रुपयाने वधारले आहेत. ही किंमत अधिक वाढण्याची शक्यता असल्याने सामान्य माणसाला त्याचा जबर फटका बसणार आहे.*आयात शुल्कातून वाढला देशाचा महसूल!कच्च्या तेलावर पूर्वी आयात शुल्क नव्हते; पण अलीक डे कच्च्या तेलावार जीएसटीसह ३८.५ टक्के आयात शुल्क लागले आहे. सोबतच रिफाईन तेलावर पूर्वी अडीच टक्के आयात शुल्क होते. ते आता ५५ टक्के वाढविण्यात आल्याने आयात शुल्कातून अंदाजे ४५ हजार कोटींची वाढ देशाच्या महसुलात होणार आहे.- वास्तविक पाहता खाद्य तेलाचे भाव अनेक वर्षांपासून स्थिर आहे. त्यात फार बदल नाही; मात्र भाजप सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात विक्रमी वाढ करून महसूल वाढविला आहे. त्यातूनच शासन शेतकऱ्यांना हमीभावाची मदत करीत आहे.-वसंत बाछुका,उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय