शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

By admin | Updated: December 18, 2014 01:02 IST

सलग तिस-या वर्षीही नरनाळा महोत्सव रद्द.

अकोला : अकोला जिल्ह्याचा सन्मान बनलेला नरनाळा महोत्सव सलग तिसर्‍या वर्षीही होण्याची चिन्हे नाहीत. मागील दोन वर्षांपासून नरनाळा महोत्सवाला जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. अकोला जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नरनाळा महोत्सव हा महत्त्वाचा दुवा बनला होता. २00७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकारातून नरनाळा महोत्सवाची मुहरूतमेढ रोवल्या गेली. अकोला जिल्ह्याचे वैभव असलेला नरनाळा किल्ला पाहताना परदेशी यांच्या मनात हा किल्ला पर्यटकांच्या नजरेपासून दूर असल्याचे लक्षात आले. पश्‍चिम महाराष्ट्रातील किल्लय़ांपेक्षा नरनाळा किल्लय़ाचे वैशिष्ट्ये खूपच वेगळे असल्याचे त्यांना दिसून आले. हा किल्ला पर्यटनाच्या नकाशावर आला पाहिजे, असे त्यांच्या मनात आले आणि नरनाळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेरुळ आणि एलिफंटा महोत्सवाच्या धर्तीवर नरनाळा महोत्सव सुरू करण्याचे मनात ठाणले आणि नरनाळा महोत्सवाचा जन्म झाला.जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी व जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव यांच्या सहकार्यातून पहिल्याच वर्षी नरनाळा महोत्सव अतिशय यशस्वी झाला. या महोत्सवामुळे नरनाळ्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला. परदेशी यांच्यानंतर मथ्थुकृष्णन यांनीदेखील नरनाळा महोत्सव आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यकाळात सलग तीन वर्ष नरनाळा महोत्सव झाला. त्या नंतरचे जिल्हाधिकारी परिमलसिंग यांनीदेखील नरनाळा महोत्सवाच्या आयोजनात रुची दाखविली आणि २0१२ मध्ये सलग सहाव्या वर्षी नरनाळा महोत्सव आयोजित केला गेला; परंतु २0१३ पासून नरनाळा महोत्सवाला ग्रहण लागले. यावर्षीदेखील नरनाळा महोत्सव होऊ शकला नाही. आता येणार्‍या वर्षातही होण्याची काही शक्यता नाही. अकोल्याचे ऐतिहासिक वैभव उजेडात आणणारा व आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा नरनाळा महोत्सव बंद झाल्यामुळे एक चांगली परंपरा खंडित झाली आहे.