शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा

By atul.jaiswal | Updated: March 31, 2024 19:11 IST

गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता.

अकोला : शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार, ३१ मार्च रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन समाज बांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थनास्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थनासभांचे तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मागील रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे साजरा करण्यात आला. त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूंनी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात २९ मार्च रोजी गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार, ३१ मार्च रोजी येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड नीलेश अघमकर यांनी ईस्टरनिमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे आठवड्यातील पहिला दिवस या विषयावर संदेश दिला.

यावेळी संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघातील सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. विविध चर्चमधील नवतरुणांना यावेळी बाप्तिस्मा देण्यात आला. तसेच लहान बालकांची अर्पणेही करण्यात आली. गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते. शहरातील सर्वच चर्चेसमध्ये ईस्टर संडे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

विदर्भात केवळ अकोल्यातच होते प्रात:कालची प्रार्थना!दरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ अकोल्यातच होते, हे उल्लेखनीय! त्यानंतर सकाळी नऊ वाजता इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधून ज्येष्ठ सदस्य जस्टीन मेश्रामकर, पंच मंडळातील राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल यांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली. यावेळी ‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,’ अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ईस्टर संडेनिमित्त नाचून आणि गाऊन विविध गीते सादर करण्यात आली आणि येशूच्या पुनरुत्थानाचा आनंद व्यक्त करण्यात आला.