शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ई-सेवा केंद्र संचालकाला ‘एसीबी’कडून अटक!

By admin | Updated: March 10, 2016 01:59 IST

वाशिम येथे अमरावती विभागातील पहिली कारवाई.

वाशिम : तक्रारदारास त्याचे जातीचे प्रमाणपत्र, मुलाचे जातीचे प्रमाणपत्र, मुलीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व तिचे रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय दराशिवाय ५00 रुपयांची लाच घेणारा महा ई-सेवा केंद्राचा संचालक दीपक रामगोपाल अग्रवाल याला एसीबीच्या पथकाने ९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रंगेहात पकडले. महा-ई सेवा केंद्राच्या संचालकाला अटक करण्याची अमरावती विभागातील ही पहिलीच कारवाई होय. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे दीपक अग्रवाल याच्याकडे शासनाचे महा ई-सेवा केंद्र आहे. तक्रारदाराला त्याचे जातीचे प्रमाणपत्र, मुलाचे जातीचे प्रमाणपत्र, मुलीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व तिचे रहिवासी प्रमाणपत्र काढून देण्याकरीता संचालक अग्रवालने १२५0 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र देण्याचे ठरले व त्याचवेळी तक्रारदाराने ५00 रुपये अग्रवालला दिले. उर्वरित ५00 रुपये फेब्रुवारीमध्ये देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदाराने वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीचे पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्‍हाडे यांनी ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास किन्हीराजा येथील महा-ई सेवा केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी दिनेश अग्रवाल याने तक्रारदाराकडून उर्वरीत ५00 रुपयांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने अग्रवाल याला रंगेहात पकडले. लाचखोर अग्रवाल याच्याविरुद्ध कलम ७, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बोर्‍हाडे यांचे पथकाचा समावेश होता. महा ई-सेवा केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लाभार्थींकडून लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु महा ई-सेवा केंद्रामध्ये लाच स्वीकारल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते, याची माहिती सर्वसाधारण जनतेला माहिती नसल्यामुळे एसीबीकडे कुणीच तक्रार देत नसल्याचा अनुभव आहे. अमरावती विभागामध्ये महा ई-सेवा केंद्राच्या संचालकाविरुद्ध कारवाई करण्याची वाशिम जिल्ह्यात सुरुवात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.