शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पॉस’ मशीन बंद; धान्य वाटपात अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:15 IST

धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन गत सात दिवसांपासून बंद पडल्याने, धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार २६ दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यात आल्या असून, बायोमेट्रिक पद्धतीने ‘ई-पॉस’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे; परंतु सर्व्हर डाउन असल्याने, गत ७ मार्चपासून जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ‘ई-पॉस’ मशीन बंद पडल्याने, धान्याचे वितरण करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील गहू, तांदूळ इत्यादी धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे.त्यानुषंगाने रास्त भाव दुकानांमधील बंद पडलेल्या ई-पॉस मशीन केव्हा पूर्ववत सुरू होणार आणि रास्त भावाच्या धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करण्याची वेळ शिधापत्रिकाधारकांवर आली आहे.

...तर दुकाने बंद ठेवणारजिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशीन ७ मार्चपासून बंद पडल्याने, धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. धान्य वेळेवर मिळत नसल्याने, शिधापत्रिकाधारकांच्या संतापाचा सामना रास्त भाव दुकानदारांना करावा लागत आहे. त्यामुळे ई-पॉस मशीन पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा रास्त भाव दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे व महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी १२ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सर्व्हर डाउन असल्याने, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण होत असल्याने, यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे.-बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :Akolaअकोला