शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’वरील ताण कमी करण्यासाठी ‘ई-फेरफार’कामाचे वेळापत्रक!

By admin | Updated: October 2, 2016 02:53 IST

२३ जिल्हय़ांचे सम तारखेत, तर १२ जिल्हय़ांचे विषम तारखेत होणार काम.

संतोष येलकरअकोला, दि. 0१- डाटाबेस सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी ह्यई-फेरफार ह्यआज्ञावली वापराचे वेळापत्रक शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख संचालक कार्यालयाच्या २८ सप्टेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हय़ांचे सम तारखेत आणि १२ जिल्हय़ांतील ह्यई-फेरफारह्ण आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे. शासनामार्फत राज्यात ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ३५८ पैकी ३५७ तालुक्यातील सात-बाराची संगणकीकृत माहिती (डाटा )ऑनलाइन करून, फेरफार नोंदी घेण्यात येत आहेत. राज्यातील २ कोटी ४५ लाख सात-बाराची संगणकीकृत माहिती (डाटा) मुंबई येथील राज्य डाटा सेंटरमधील तीन डाटा सर्व्हरवर अपलोड करण्यात आला आहे. या माहितीचा वापर राज्यातील १२ हजार ६३७ तलाठी व २ हजार १0६ मंडळ अधिकारी करीत आहेत. सद्यस्थितीत ऑनलाइन माहितीमधील (डाटा) चुका दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन सर्व्हरचा वापर राज्यात एकाच वेळी करण्यात येत असल्याने डाटाबेस सर्व्हरवर ताण येत आहे. त्यामुळे ई-फेरफारच्या ऑनलाइन कामात अडचणी येत आहेत. या पृष्ठभूमीवर डाटाबेस सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी ई-फेरफार आज्ञावलीच्या वापराचे वेळापत्रक शासनाच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हय़ांचे काम सम तारखेत आणि १२ जिल्हय़ातील ई-फेरफार आज्ञावलीतील काम विषम तारखेत करण्यात येणार आहे. यासंबंधी शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.जिल्हानिहाय ई-फेरफार आज्ञावलीत कामाचे असे आहे वेळापत्रक!२,४,६ अशा सम तारखेस मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, बीड व परभणी इत्यादी २३ जिल्हय़ांत ई-फेरफार आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे. तसेच १,३,५ अशा विषम तारखेस कोल्हापूर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव व गोंदिया या १२ जिल्हय़ात ह्यई-फेरफारह्ण आज्ञावलीत काम करण्यात येणार आहे.