शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘द्वारका उत्सव’ होतोय नामशेष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 02:31 IST

वाशिम येथील उत्सव राज्यात प्रसिद्ध; बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरने.

वाशिम, दि. १: राज्यात प्रसिद्ध असलेला वाशिम येथील द्वारका उत्सव दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. या उत्सवातील लोकांचा कमी होत असलेला सहभाग व बैलांच्या रोडवलेल्या संख्येवरून या उत्सवाला उतरती कळा लागल्याचे दिसून येते. वाशिम येथील द्वारका उत्सव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचे वाशिम जिल्ह्याचा इतिहास या पुस्तकात नमूद आहे. पर्यावरणाप्रती जागृती करण्यासोबतच प्राणिमात्रांवर प्रेम करण्याच्या संदेश देणारा हा उत्सव १९५४ पूर्वी सुरू झाल्याचे ज्येष्ठ नागरिक दिनकर वाटाणे यांनी सांगितले. १९५४ मध्ये येथील चंदू माळी व नामदेव मामा यांनी या उत्सवाला राज्यस्तरीय रूप दिले होते. त्यानंतर सातत्याने हा उत्सव याच पद्धतीने साजरा केल्या जाऊ लागला; मात्र गत ८ ते १0 वर्षांपासून या उत्सवास उतरती कळा लागली. त्याचे कारणही तसेच आहे. पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या उत्सवात मोठय़ा प्रमाणात आधी बैलांचा समावेश राहायचा. सध्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैलांची संख्याही फार कमी झाली आहे. यामुळे या उत्सवातील बैलांची संख्याही कमी होत आहे. तथापि, दरवर्षी शहरात द्वारका उत्सव साजरा होतो; मात्र यामध्ये दिवसेंदिवस बैलांची संख्या रोडावली आहे. येथील देवपेठ व चामुंडा देवी द्वारका उत्सव मंडळाच्या सदस्यांसह इतरही मंडळांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. याही वर्षी द्वारका उत्सवाचे २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.वाशिम येथील द्वारका येथे पोळय़ाच्या दुसर्‍या दिवशी द्वारका निघतात. कामट्या व चमकिले ताव, कागद यापासून उंच अशी सचित्र द्वारका उभारतात. यामध्ये दिंडी, भजनी मंडळ, लेजीम इत्यादी सहभागी होतात. शेतकरी आपल्या बैलांना सजवून सहभागी करतात. सजविलेल्या बैलांना व दिंडीला बक्षिसेही असतात. शहरातील ठरवून दिलेल्या मार्गावरून बालाजी मंदिरासमोर गेल्यावर महाप्रसाद होतो. यामध्ये तरुण-तरुणींचा पूर्वी समावेश राहायचा.-स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला द्वारका उत्सव नेमका कधी सुरू झाला, हे जरी सांगता येत नसले तरी १९५४ च्या दरम्यान हा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून नागरिक यायचे. यंत्रयुगामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने याचा परिणाम या उत्सवावरही झाला. तरीही तरुण मंडळी तो टिक वून आहे.- दिनकर वाटाणेसधन शेतकरी, वाशिम