शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

तुटलेल्या रुळावरून धावली ‘दुरंतो’ आणि ‘गरीबरथ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:57 IST

अकोला : यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान रविवारी पहाटे  मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस गेल्यानंतर रेल्वे रुळ तुटल्याचा  खुलासा प्रथमदश्री पाहणीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

ठळक मुद्देभार सहन न झाल्यामुळे तुटला रुळ प्रथमदश्री पाहणीतील  खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान रविवारी पहाटे  मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस गेल्यानंतर रेल्वे रुळ तुटल्याचा  खुलासा प्रथमदश्री पाहणीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.  ‘दुरंतो’नंतर याच रेल्वे रुळाच्या तुटलेल्या भागावरून पुणे-नाग पूर गरीबरथसुद्धा रवाना झाली. घटनास्थळावरून ‘दुरंतो’ रवाना  होण्यापूर्वी रेल्वे रुळ जोडण्यासाठी करण्यात आलेले वेल्डिंग  सुस्थितीत होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सुदैवाने मोठा अपघात टळला पण, दुरंतो एक्स्प्रेसचा भार सहन  न झाल्यामुळेच रेल्वे रुळाचा तुकडा पडल्याचे तत्प्रसंगी गस्तीवर  असलेल्या ट्रॅकमॅन किशोर काशीराम काळे याने सांगितले. मध्य  रेल्वे मार्गावर दररोज धावणारी १२२८९ मुंबई सीएसटीएम -  नागपूर दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री ३.४८ वाज ताच्या दरम्यान अकोला रेल्वेस्थानकावरून पुढच्या प्रवासाला  निघते. शनिवारी रात्री ८.१५ वाजता मुंबईवरून निघालेली ही  गाडी रविवारी पहाटे ४.१६ वाजता अकोला रेल्वेस्थानकावरून  निघाली. यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान धावत असताना रेल्वे  रुळाचा एक भाग तुटला. मात्र वेगाने धावणारी दुरंतो एक्स्प्रेस  रुळाच्या तुटलेल्या भागावरून सहज निघून गेली. याचवेळी  ट्रॅकमॅन किशोर काळे यांच्या दृष्टीस पडलेली ही बाब त्यांनी  वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. माहिती मिळताच  दुरंतो एक्स्प्रेसच्या मागे धावत असलेल्या एलटीटी-हावडा  ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसला यावलखेडजवळ थांबविण्यात आले, तर  पुणे-हावडा आजाद हिंद एक्स्प्रेस व मुंबई-अमरावती एक्स्प्रेस  या दोन्ही गाड्या अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आल्या.  त्यांच्याच पाठीमागे धावत असलेल्या मुंबई-हावड मेलला  गायगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. घटनास्थळी  दाखल झालेल्या रेल्वे अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने  तुटलेला रेल्वे रुळ बदलला आणि थांबलेल्या सर्व गाड्या पुढे  रवाना करण्यात आले. 

गरीबरथ रवाना होत असताना आला आवाजघटनास्थळावरून मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस गेल्यानंतर, पहाटे  ५.२७ वाजता पुणे-नागपूर गरीबरथ घटनास्थळावरून रवाना हो त असताना ट्रॅकमॅन किशोर काळे यांना आवाजावरून काहीतरी  गडबड असल्याचे जाणवले. गरीबरथ गेल्यानंतर त्यांनी टॉर्चच्या  उजेडात पाहिले असता रेल्वे रुळ तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास  आले. त्यांनी लगेच यावलखेड रेल्वेस्थानकाजवळ उभ्या  असलेला त्यांचे सहकारी धर्मेंद्र सदांशिव यांना याबाबत सुचित  केले. यामुळे ज्ञानेश्‍वरी एक्स्प्रेसला यावलखेड रेल्वे स्थानकाजवळ  थांबविण्यात आले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास् थळी दाखल झाले. त्यानंतर तुटलेला रुळ बदलण्यात आला व  थांबलेल्या सर्व गाड्या पुढे रवाना करण्यात आल्या.

यावलखेड-बोरगाव मंजूदरम्यान रेल्वे मार्गालगत आढळलेला  तुटलेल्या रेल्वे रुळाचा तुकडा अधिक तपासासाठी मुंबईला  पाठविण्यात आला आहे. यानंतर तो लखनऊ येथे पाठविण्यात  येणार आहे. गस्तीवर असलेल्या ट्रॅकमॅन किशोर काळे यांच्या  सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याप्रीत्यर्थ त्यांना  रेल्वे प्रशासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. - आर. के. यादव, डीआरएम, मध्य रेल्वे, भुसावळ

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी