शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

पावसाळ्यात डासांचा उच्छाद, मलेरियाचे रुग्ण वाढले

By सचिन राऊत | Updated: July 18, 2024 19:47 IST

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार असून तो प्लास्मोडिअम नावाच्या परजिवींमुळे होताे.

अकाेला : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मलेरियाच्या रुग्णांमध्ये गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती आराेग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मलेरिया व हिवतापाचे रुग्ण जास्त असून यावर आराेग्य विभागाकडून उपाययाेजना करण्यात येत आहेत.

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार असून तो प्लास्मोडिअम नावाच्या परजिवींमुळे होताे. डास हे रोगवाहक म्हणून कार्य करतात. मादी डास चावल्याने या परजिवीचा प्रसार होतो आणि ताप, डोकेदुखी आणि उलटीसारख्या फ्लूसदृश लक्षणांमुळे मलेरिया झाल्याचे डाॅक्टरांच्या निदर्शनास येताच या आजारावर याेग्य ताे उपचार करण्यात येताे. प्लास्मोडियम परजिवीमुळे मलेरिआ हाेत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. मलेरियाचे कारण असलेल्या इतर चार प्रकारांपैकी प्लाझोमोडियम फाल्सीपेरम हे दरवर्षी सुमारे ९ टक्के मलेरिया रुग्णांच्या मृत्यूंना जबाबदार असल्याची माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली. मलेरियाची लक्षणे - कणकणीसह थंडी वाजणे.- अतिप्रमाणात ताप, डोकेदुखी आणि उलटी होणे.- कधीकधी तरुण रुग्णांना आकड्या येऊ शकतात.- घाम आल्यानंतर ताप जातो. थकवा व गळून गेल्याची जाणीव होते.- पाठ वर करून स्थितीत झोपण्याची इच्छा.- खोल श्वास आणि श्वास घेण्यात अडचण.- रक्तक्षयाची लक्षणे. थकल्यासारख्या आणि सामान्य अशक्तपणा जाणवणे. मलेरियावर उपाययाेजनामलेरिय या आजारावर उपचार करताना आजाराची तीव्रता बघून उपाय करण्यात येतात. यामध्ये क्लाेराेक्वीन, प्रायमाक्वीन यांसारखी मलेरियाला प्रतिबंध घालणारी औषधे देण्यात येतात. रुग्ण अधिक गंभीर असल्यास ताेंडावाटे औषध न देता सलाइन व इंजेक्शनद्वारे औषधाेपचार करून उपाययाेजना करण्यात येतात. मलेरियाचे रुग्ण डासांमुळे वाढले असले तरी त्यावर तातडीने उपाययाेजना करणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छता, कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून काेणताही साथीचा आजार किंवा मलेरिया, डायरिया यांसारखे आजार हाेणार नाहीत. आराेग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना करून काळजी घेण्यात येत आहे.-  डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, अकाेला 

टॅग्स :Akolaअकोला