शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पारा ३६ च्या वर

By admin | Updated: August 11, 2014 22:54 IST

रपावसाअभावी सारेच चिंतातुर : शेतकर्‍यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे

खामगाव : पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात परंतु जोराच्या वाहत्या वार्‍यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातुर झाले आहेत. चालु आठवड्यात तापमानाचा पारा वाढला असून काल रविवारी कमाल तापमान ३६.0४ अंश से. एवढे होते. खरिप हंगामातील पेरण्या जून महिन्यात होतील या आशेने शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी केली होती. मृग नक्षत्रातील पाऊस पडताच शेतकरी पेरणीस लागतात. मात्र यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या तब्बल दिड महिना उशीरा झाल्या. अर्धा जुलै महिना होईपर्यंंत पाऊस आलाच नाही. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीकरिता लागणारी बी-बीयाणे साठी शेतकर्‍यांनी बॅकाचे तसेच खाजगी कर्ज काढले आहे. मात्र पेरणी झाली व रिमझीम पावसामुळे पिके निघुन आली. दमदार पाऊस येईलच या आशेने शेतकरी पावासाची वाट पाहत आहे. निघुन आलेली कोवळी पिके हवेत डोलत असली तर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकर्‍यांसमोर उभे राहिले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त नाही तर सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर होणार असल्याचा अंदाच येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील अनेक भागामध्ये ढग दाटुन येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वार्‍यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. पाऊस आल्यास हवेत आर्द्रता निर्माण होवून उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३४ अंशावरून ३६ अंशापर्यंंंत जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते.

** कोरड्या दुष्काळाची भीती

पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थीती गभीर होत चालली आहे. गेल्या सहा दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने उगवलेली रोपे कोमजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही तर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यासह सामान्य नागरिकांनाही पावसाची प्रतिक्षा असुन दुष्काळ पडण्याची अनेकांना भीती वाटत आहे.