शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

दिवसभरात ५३७ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, ३८५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:17 IST

CoronaVirus in Akola आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७१ , तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६६ अशा एकूण ५३७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

कोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, १४ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०२ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७१ , तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६६ अशा एकूण ५३७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,५९९ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३०७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ५३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८३६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील ४८, मुर्तिजापूर येथील २८, चोहट्टा बाजार येथील १५, लहान उमरी येथील १२, तेल्हारा व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, खडकी व अकोली जहागीर येथील प्रत्येकी १०, खदान येथील नऊ, जठारपेठ व वैराट येथील प्रत्येकी आठ, वाडेगाव येथील सहा, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, कौलखेड, गुडधी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, खापरवाडा, पातूर, शास्त्री नगर, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार, केशव नगर, गायत्री नगर, सांगळूद, अकोट, अकोट फैल, जीएमसी व मोझर येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, रामदासपेठ, भारती प्लॉट, जूने शहर, मासा, निमवाडी, शासकीय निरिक्षणगृह, आनंद नगर, शासकीय महिला राज्यगृह, न्यु तापडीया नगर, रिले, रामटेक व पिकेव्ही क्वॉर्टर येथील प्रत्येकी दोन, पळसो बढे, नायगाव, आगर, उगवा, सांगवी खुर्द, तापडीया नगर, निबंधे प्लॉट, गावंडगाव, माधव नगर, कासली खुर्द, मिर्झापूर, भगीरथ नगर, पिंपलोड, पांढूर्णा, शंकर नगर, बापू नगर, संतोष नगर, सुर्या गार्डन, हिंगणा फाटा, म्हाडा कॉलनी, झेडपी कॉलनी, ढेकर नगर, इंद्रा नगर, जवाहर नगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, ज्ञानेश्वर नगर, शिवनगर, जोगळेकर प्लॉट, शिवचरण पेठ, खंडाळा, जयहिंद चौक, विद्या नगर, जीएमसी गर्ल्स होस्टल, दक्षता नगर, बाजोरिया हाऊस, सोळाशे प्लॉट, चैतन्य नगर, पंचशील नगर, शिवर, सोपीनाथ नगर, संता नगर, तारफैल, गुलजारपुरा, व्हीबीएच कॉलनी, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, अकोली, हरिहर पेठ, मराठा नगर, मुकूंदवाडी, गौतम नगर, आळशी प्लॉट, भौरद, पंचशिल नगर, वाझेगाव, धानोरी, कावसा, सिसो, द्रावहा, उमरी नाका, विझोरा, शिवापूर, कॉग्रेस नगर, राम नगर, माळीपूरा, राजीव गांधी नगर व यशवंत नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी मुर्तिजापूर येथील १८, विवरा येथील १५, जितापूर ता.मुर्तिजापूर व पातूर येथील प्रत्येकी नऊ, खडकी येथील पाच, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड, जूने शहर, डाबकी रोड, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, जवाहर चौक, शिवाजी नगर, रामदासपेठ, शिवणी, जीएमसी, चतारी, लहान उमरी, कान्हेरी सरप, न्यु तापडीया नगर, तापडीया नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, मोहम्मद अली चौक, गोडबोले प्लॉट, खरप, रेणूका नगर, गड्डम प्लॉट, तारफैल, तोष्णीवाल लेआऊट, बजरंग चौक, किर्ती कॉलनी, फिरदोस कॉलनी, केशव नगर, अगरवेस, बापू नगर, गुलजारपुरा, रजपूतपुरा, अंसर कॉलनी, वाशिम बायपास, कानशिवणी, साहू नगर, गायत्री नगर, गुरुदेव नगर, महाकाली नगर, हरिहर पेठ, बोरगाव, बाजोरिया लेआऊट, इद्रानगर, पारस, मोऱ्हळ, तामसी, सावरगाव, कृषी नगर, सहकार नगर, तुकाराम चौक, कोठारी वाटीका मागे व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोन पुरुषांचा मृत्यू

अकोट तालुक्यातील करोडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना ११ रोजी दाखल करण्यात आले होते. शैलार फैल, अकोला येथील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

३८५ जणांना डिस्चार्ज

दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून आठ, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून आठ, आर्युवेदीक रुग्णालयातून१६, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर, येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील २८० अशा एकूण ३८५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

५,१८४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,५९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,१८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला