शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत दुर्गेश व शेख नजीरमध्ये चुरशीची लढत

By admin | Updated: August 31, 2014 00:18 IST

अकोला येथे सुरू असलेल्या विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेतील उपान्त्यफेरीत नागपूरचे वर्चस्व कायम

अकोला: विदर्भ कॅरम अकादमीच्या सभागृहात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. नागपूरच्या दुर्गेश पांडे व शेख नजीर शेख बाबू यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत दुर्गेशने २५-९,२५-१५ अशा गुणांनी विजय मिळवून मिळविला.शनिवार ३0 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य व आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या उप-उपान्त्यफेरीत दुर्गेश पांडे व शेख नजीरमध्ये उत्कंठावर्धक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शेख नदीम गुलाम अहमद व फैजल बुधवाणी यांच्यात एकतर्फी लढत झाली. शेख नदीमने २५-0,२५-0 अशी लढत जिंकली. प्रदीप राठौड व सुमित परदेसी यांच्यातील लढतीचा निकाल २५-५,२५-९ असा लागला. सौरभ सांगोले व प्रतीक पांडे यांनी सुंदर खेळप्रदर्शन केले. ही लढत सौरभने २५-९,२५-१२ अशी जिंकली. याच गटातील उपान्त्यफेरीत सौरभने प्रदीपचा २५-६,२५-२0 असा पराभव केला. दुर्गेशने नदीमला २५-१,२५-४ अशी मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केला.ज्युनिअर गर्ल्स एकेरीच्या उपान्त्य फेरीत चंदा शास्त्री हिने अकोल्याच्या अनम खान हिचा २५-५,२५-१0 असा पराभव केला. तर श्रद्धा शर्मा हिने मेघा बंग हिचा २५-0,२५-४ असा पराभव केला. सब-ज्युनिअर गर्ल्स उपान्त्यफेरीत अमिता ठोसरे हिने अबोली पाटील वर २५-२,२५-१ अशी मात केली. अदिती क्षीरसागर हिने पूजा लाडखेडकर हिच्यावर२५-0,२५-0 असा एकतर्फी विजय मिळविला. सब-ज्युनिअर बॉईज गटात दीपक पाटील याने आयुष राठीवर २५-१२,२५-१२ असा विजय मिळविला. नीलाक्ष चव्हाण याने सुयोग नालिंदे याचा २५-३,२५-२ असा पराभव केला. युश बॉईज गटात विक्की साखरे याने विजय जोशी याचा २५-६,२५-७ असा पराभव केला. मोनिष मेश्रामने राजू अंभोरेचा २५-५,२५-१0 ने पराभव केला. युथ गर्ल्समध्ये नम्रता जोशी हिने अंजली वाघ हिला २५-६,२५-९ असे पराभूत केले. कॅडेट बॉईज गटात पीयूष उके याने साईकृष्ण दहिकरवर २५-४,२५-९ मात केली. यश दुबे याने अनुज सातवचा २५-५,२५-१0 असा पराभव केला. कॅडेट गर्ल्स मध्ये गायत्री येलवणकर हिने चिन्मयी घोटीकर हिला २५-६,२५-८ अशा गुणांनी हरविले. श्रेया अग्रवाल हिने गरिमा जालान हिला २५-१0,२५-३ ने पराभूत केले. स्पर्धेचा समारोप उद्या रविवार ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३0 वाजता आमदार गोपीकिसन बाजोरिया व माजी क्रीडा राज्यमंत्री खान मो.अजहर हुसैन यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे