शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दनोरी येथील तरुणाची निर्घृण हत्या

By admin | Updated: November 9, 2014 00:40 IST

अकोट तालुक्यातील घटना, सात आरोपींना अटक आणि पोलिस कोठडीत रवानगी.

चोहोट्टा बाजार (अकोला) : आकोट तालुक्यातील दनोरी येथील एका तरुणास त्याच गावातील काही जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मिनी ट्रकने चिरडून त्याची हत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी ७ आरोपींना अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत दनोरी येथे ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जुन्या वादावरून ३८ वर्षीय संदीप शालीग्राम पाखरे याला आरोपींनी सगनमत करून कुर्‍हाड, काठी, पाइपने मारहाण केली. यामध्ये तो जिवंत राहू नये म्हणून ४0७ मिनी ट्रकखाली चिरडून टाकण्यात आले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मृतकाचा भाऊ देवानंद शालीग्राम पाखरे याने दहीहांडा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रेमदास रामराव पाखरे, तिरंदास रामराव पाखरे, अशोक रामराव पाखरे, हिरालाल नाजुकराव पाखरे, नाजुकराव सारंगधर पाखरे, मुरलीधर सारंगधर पाखरे, सिद्धार्थ नागोराव धांडे सर्व रा. दनोरी यांचे विरुद्ध भादंवि कलम ३0२, १४७, १४८, १४९ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनात दहीहांडा ठाणेदार ताराचंद किल्लेवाले व कर्मचारी पांडुरंग राऊत, संजय घायल, अशोकसिंग ठाकूर, केशव धोटे, मंगेश महाजन, प्रवीण ठाकरे, सुभाष थोरात यांनी आरोपींना रात्रीच अटक केली. आरोपींना ८ नोव्हेंबर रोजी आकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.