शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात झोननिहाय होणार डम्पिंग ग्राउंड

By admin | Updated: April 20, 2017 01:35 IST

अकोलेकरांच्या डोकेदुखीत भर : कचऱ्यावर व्हावी प्रक्रिया!

आशिष गावंडे - अकोलाकचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत आहे. शहराचा विस्तार व कचऱ्याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मनपाचा हा प्रयोग भविष्यात अकोलेकरांच्या डोकेदुखीत वाढ करणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साठवणूक होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पाण्याचे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. शिवाय, स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. शहरातील कचरा घेऊन जाणाऱ्या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’वरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक असताना महापालिकेने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यानुषंगाने जागेचा शोध घेतला जात आहे. झोननिहाय कचरा साठविल्यास शहराच्या चारही बाजंूनी दुर्गंधीची समस्या निर्माण होऊन जलस्रोत दूषित होतील, यात दुमत नाही. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. मनपा हद्दीबाहेर हवी असलेली जागा कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असले, तरी ठोस उपाय निघत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी आयुक्त लहाने यांनी मनपा क्षेत्रात सामील झालेल्या विविध शासकीय जमिनींची पाहणी केली होती. त्यामध्ये ‘ई-क्लास’ जागेचा समावेश होता. प्रशासनाने मनपा क्षेत्रात डम्पिंग ग्राउंड निर्माण न करता मनपा क्षेत्राबाहेरील ‘ई-क्लास’ची जागा मिळविण्याची गरज आहे. कचऱ्याला आग; नागरिक त्रस्तउन्हाळ्यात नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडला सतत आग लागते. बुधवारी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. कचऱ्याची साठवणूक सुरू!मनपाच्या घंटागाडी चालकांकडून झोननिहाय कचरा साठवणूक केली जात आहे. पूर्व झोनमध्ये प्रभागातच कचरा साठविला जात असून, पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या डाबकीच्या पुढे पडीक जागेवर तसेच दक्षिण झोन अंतर्गत रिजनल वर्कशॉप परिसरातील मनपाच्या जागेवर कचरा साठविला जात आहे.