शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने गहाण ठेवणा-यास एक दिवस कोठडी

By admin | Updated: August 1, 2016 01:13 IST

बँकेच्या वाशिम शाखेतही ९0 हजारांनी फसवले होते.

अकोला: चांदीच्या दागिन्यांना सोन्याचे पॉलिश देऊन ते एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस रविवारी प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.वाशिम येथील पुसद नाका परिसरातील रहिवासी तुकाराम रामेश्‍वर महाले याने गांधी रोडवर असलेल्या इंडिया फायनान्स कंपनीमध्ये जाऊन ३३ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या रिंग गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र शाखा व्यवस्थापक राहुल श्यामराव गंगाडे यांनी सोन्याच्या रिंग तपासणीसाठी सोनाराकडे पाठविल्यानंतर त्या बनावट असल्याचे समोर आले. चांदीच्या असलेल्या दागिन्यांवर सोन्याचे पॉलिश देऊन ते दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे गंगाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाची माहिती तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना दिली. यासोबतच कंपनीच्या वाशिम येथील शाखेशी संपर्क साधला असता महाले याने कंपनीच्या वाशिम शाखेतही बनावट सोने ठेवून ९0 हजार रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले. या प्रकरणी राहुल गंगाडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी तुकाराम महाले याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४0६, ५११ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला रविवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. केशव गिरी, वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले.