शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

खोदलेल्या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:15 IST

रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी तीन महिन्यांत महापालिकेच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली.

अकोला: शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना तसेच एलईडी पथदिव्यांची उभारणी करताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी तीन महिन्यांत महापालिकेच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली. खोदकाम झालेल्या रस्त्यांवर चिखल पसरल्यामुळे ही कामे अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचा मुद्दा प्रकर्षाने नमूद करण्यात आला होता, हे विशेष.‘अमृत’ योजनेंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनी बदलण्याचे काम होत आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले असून, जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराकडून मुख्य रस्त्यालगत व प्रभागात थेट रस्ते खोदून जलवाहिनी टाकली जात आहे. दुसरीकडे एलईडी पथदिवे उभारण्यासाठी राज्य शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. कंपनीकडून संपूर्ण शहरात सुमारे २३ हजार एलईडी पथदिवे लावल्या जाणार आहेत. भूमिगत केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांलगत तसेच रस्त्याच्या मधातून खोदकाम केले जात आहे. शहरातील विकास कामांना नागरिकांचा अडथळा नसला तरी खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते असो वा प्रभागातील गल्लीबोळात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल साचत असून, त्यातून मार्ग काढताना अकोलेकरांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे.अखेर महापौरांनी तोडगा काढला!जलवाहिनीचे जाळे व पथदिव्यांची उभारणी करताना शहरात गल्लीबोळात खोदकाम होत असले तरी रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वैताग आला आहे. याप्रकरणी महापौर विजय अग्रवाल यांनी तोडगा काढण्याची अपेक्षा वर्तविली जात होती. अखेर महापौरांनीच मनपाच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.कंपनीला आकारणार दंड!खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची आहे. कंपनी रस्ते दुरुस्त करीत नसेल, तर रस्त्यांचे मोजमाप घेऊन त्या बदल्यात कंपनीला दंड आकारला जाईल, असे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका