शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट !

By admin | Updated: June 25, 2017 13:48 IST

वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेतकरी हवालदिल ; बियाणे बाजारातील गर्दी ओसरलीअकोला : वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिच्छिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाली असून, शेतकर्‍यांनी अद्याप पुर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठाची खरेदी केलेली नाही.अमरावती,अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्हयात जवळपास ५0 ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्हयात १0 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अध्र्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात ५0 टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे. त्यातील २ लाख ५0 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. हे क्षेत्र ५१ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील पेरणीचे असून,जवळपास ४ लाख हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. घाटाखालील परिस्थिती नाजूक आहे.पाऊस न आल्यास घाटाखाली आणि घाटावरील पिके उलटण्याची शक्यता आहे. अक ोला जिल्हय़ातही ४ लाख ८६ हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १0 टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातही ५0 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.

- पाऊस लाबंला आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली वर्‍हाडातील पिके कोमेजू लागली आहेत. बुलडणा जिल्हयातही हीच परिस्थिती आहे.घाटाखालची परिस्थिती नाजूक आहे. घाटावरही आता पाऊस हवा आहे. एक दोन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. - प्रमोद लहाळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा.