शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

जिल्ह्यात सेविकांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:15 IST

अकोला : राज्यभरातील अंगणवाडी सेविका सध्या महिनाभरापासून त्यांच्या विविध संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संप काळात शासनाने आशा सेविकांना बालकांना पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, अंगणवाडी सेविकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी केंद्र बंद असून, काही ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी केंद्राबाहेर उघड्यावर बालकांना पोषण आहाराचे वितरण करीत आहेत; मात्र बहुतांश बालक पोषण आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा गावात केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनबहुतांश बालक पोषण आहारापासून वंचितकाही गावात अंगणवाडीबाहेर केले जाते पोषण आहाराचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यभरातील अंगणवाडी सेविका सध्या महिनाभरापासून त्यांच्या विविध संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संप काळात शासनाने आशा सेविकांना बालकांना पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, अंगणवाडी सेविकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी केंद्र बंद असून, काही ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी केंद्राबाहेर उघड्यावर बालकांना पोषण आहाराचे वितरण करीत आहेत; मात्र बहुतांश बालक पोषण आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा गावात केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे.

आगर परिसरात अंगणवाडीमध्ये खिचडी वाटप बंद!आगर : अंगणवाडी मदतनीस, सेविका गेल्या महिन्यापासून आपल्या मागण्यांसाठी संपावर गेल्याने महिनाभरापासून खिचडी शिजत नसल्याने अंगणवाडीतील चिमुकले आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ६ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आली.मागील महिन्यापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याने जिल्हा प्रशासनाने आहार पुरवण्याची जबाबदारी आशा सेविकांकडे सोपविली आहे. यामध्ये अनेक आशा सेविका आहार वाटण्यास राजी नाहीत. अशावेळी अंगणवाडीला आहार पुरवठा करण्याची जबाबदारी महिला बचत गटाकडे सोपविली जात असली, तरी अनेक ठिकाणी बचत गटांकडूनही नकार मिळत आहे. अशाप्रकारे अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या संपाला आशा सेविका व बचत गटांचा अघोषित पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. यासंदर्भात शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आगरसह खांबोरा, पाळोदी, खेकडी, उगवा येथेही बालकांना पोषण आहाराचे वाटप बंद असल्याचे दिसून आले. 

आशा सेविकांवर दबावअंगणवाडी सेविकांचा संप मिटत नसल्याचे पाहून प्रशासनाने आशा सेविकांना आहार पुरवठा करण्याचे लेखी आदेश दिले आहेत; पण अनेक आशांनी विरोध केल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही आशा सेविकांनी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करणे म्हणजे दुसर्‍याच्या घरात घुसण्याचा प्रकार असल्याचे मत बोलून दाखविले आहे. या प्रकाराकडे शासनाने लक्ष घालून सेविका संप मिटवावा व आहार पूर्ववत व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाडी अदमपूरमध्ये अंगणवाडी बंदवाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या वाडी अदमपूर येथील अंगणवाडीसंदर्भात ६ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन केले असता संपकाळात अंगणवाडी बंद असल्याचे व तेथील बालक पोषण आहारापासून वंचित असल्याचे आढळून आले. तसेच अंगणवाडी शाळेच्या आवारात गुरांचा संचार असल्याची बाब समोर आली. वाडी अदमपूर गावात तीन अंगणवाडी शाळेचे वर्ग आहेत. ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविकांच्या संपापासून या गावातील तीनही वर्ग बंद असल्याची माहिती समोर आली आहे. अंगणवाडी शाळा बंद असल्याने लहान बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. 

अंगणवाडी सेविका वाटप करू देत नसल्याची आशांची तक्रारवाडेगाव : वाडेगावात मागील एक महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालकांना पोषण आहार वाटप बंद आहे. शासनाने पोषण आहाराच्या वाटपाचे काम संप मिटेपर्यंत आशा सेविकांना करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, अंगणवाडी सेविका आशा सेविकांना पोषण आहार वाटप करू देत नसल्यामुळे पोषण आहार वाटप बंद  आहे. यामुळे अंगणवाडीतील बालक पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.वाडेगावात एकूण १४ अंगणवाडी केंद्र आहेत. त्यात २0 अंगणवाडी सेविका व २0 मदतनीस आहेत. सध्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी येथील १७ आशा स्वयंसेविकांना पोषण आहार वाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आशा सेविका २७ सप्टेंबर रोजी पोषण आहार वाटप करण्यासाठी गेल्या असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना अंगणवाडीत येऊ दिले नाही, तसेच पोषण आहार वाटप करू नका, असे सांगून अडथळा आणला, अशी तोंडी तक्रार आशा सेविकांनी गटप्रवर्तकांकडे दिली आहे. यामुळे काही अंगणवाड्या चक्क बंद आढळल्या. परिणामी, कोणत्याही ठिकाणी आशा स्वयंसेविका पोषण आहाराचे वाटप करताना दिसून आल्या नाहीत. काही ठिकाणी बचत गटांना पोषण आहाराचे वाटप करण्यास सांगितले असल्याने काही अंगणवाड्यांमध्ये बचत गट पोषण आहाराचे वाटप करताना दिसून आले. त्यामुळे आशा सेविकांना आदेश देऊनसुद्धा त्या पोषण आहाराचे वाटप करू शकल्या नाहीत. कोणाच्या आदेशाचे पालन करावे, असा प्रश्न आशा सेविकांना पडला असल्याचे आशा स्वयंसेविकेच्या गटप्रवर्तक अर्चना मानकर यांनी सांगितले. 

कुरुम येथे पोषण आहार वाटप बंद!कुरूम : मूर्तिजापूर पं. स. अंतर्गत येत असलेल्या कुरूम येथील ८ अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांच्या संपकाळात बालकांना दिला जाणारा पोषण आहार वाटप बंद आहे. अंगणवाडी सेविका सध्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या  काळात शासनाने आशा सेविकांनी पोषण आहाराचे वाटप करावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आशा सेविका अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करीत आहेत काय, हे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १0.३0 ते १.३0 वाजताच्या दरम्यान कुरूम येथील आठही अंगणवाडी केंद्रात स्टिंग ऑपरेशन केले असता, तेथे पोषण आहाराचे वाटप पूर्णपणे बंद असल्याचे आढळून आले.

२४७ बालक पोषण आहाराविनासिरसोली:   येथे  एकूण  पाच अंगणवाडी केंद्रे असून, अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे  मोजक्याच बालकांना वगळता उर्वरित २४७ बालकांना पोषण आहाराचे वाटप  सद्यस्थितीत बंद असल्याची बाब ६ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली आहे.येथील पाच अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणार्‍या  २७२ बालकांपैकी  २५  बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरित  २४७  बालकांना आहार वाटप सध्या बंद आहे. येथे पोषण आहार बचत गटामार्फत शिजविला जातो;  परंतु २४७ बालकांना पोषण आहार वाटप केले जात नसल्यामुळे त्या बालकांना पोषण आहाराविना राहावे लागत असल्याची गावातील सर्व अंगणवाडी केंद्रांना  भेट दिली असता, त्या बंद स्थितीत दिसल्या आहेत.

बचत गटामार्फत समाज मंदिराच्या ओट्यावर आहार वाटपअडगाव बु.: गेल्या ११ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संपात येथील १0 अंगणवाडी सेविकांपैकी आज रोजी ९ सेविका व ९ मदतनीस संपात सामील झालेल्या असल्याची माहिती पर्यवेक्षिका नागझरीकर यांनी दिली. येथील सर्वच अंगणवाड्यांमध्ये बचतगटाच्या मार्फत आहार देण्याचे काम दिलेले आहे. काही बचत गटाजवळ बालकांची यादी नसल्याने जमेल तेवढय़ा व माहिती असलेल्या बालकांना आहार वाटपाचे काम केल्या जात आहे. यामुळे बालकांची संख्या घटली. अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने कुठे अंगणवाडीसमोर, कुठे समाज मंदिरात तर कुठे ओट्यावर आहार वाटप केल्या गेला. दिलेला आहार हा बचत गटांनी घरूनच शिजवून आणला होता. अंगणवाड्या बर्‍याच दिवसांपासून बंद असल्याने बालकांना फक्त आहारापुरतेच अंगणवाडी परिसरात आणल्या जात असल्याचे दृश्य होते.