शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या थंडीमुळे ‘हार्ट अटॅक’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:32 IST

अकोला : थंडीचा मौसम आरोग्यदायी मानल्या जातो; परंतु याच थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोकाही जास्त असतो. पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता चक्क तिशीनंतरही त्याचा धोका वाढला आहे.

- प्रवीण खेतेअकोला : थंडीचा मौसम आरोग्यदायी मानल्या जातो; परंतु याच थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोकाही जास्त असतो. पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता चक्क तिशीनंतरही त्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच थंडीच्या दिवसांत योग्य ती सतर्कता घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिवाळा हा ऋतू सर्वांसाठीच हितकारी ठरतो; पण त्याचसोबत अस्थमा, त्वचा विकाराच्याही समस्या या दिवसांत वाढतात. योग्य काळजी घेतल्यास या समस्यांवरही मात करणे शक्य आहे; परंतु वयाच्या चाळिशीनंतरच्या व्यक्तींना या दिवसांत हार्ट अटॅकचा जास्त धोका असतो. मागील दशकात जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे हा धोका वयाच्या तिशीनंतरच जाणवू लागला आहे. थंडीमुळे हृदयाला आवश्यक रक्त पुरवठा होत नसल्याने या दिवसांत हार्ट अटॅकमुळे मृत्यूचे प्रमाणही एरवीपेक्षा जास्त असते. त्याला आपल्या काही चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अशा परिस्थितीत स्वत:चा बचाव करायचा असेल, तर योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.रात्री ३ ते पहाटे ६ धोक्याची घंटाथंडीच्या दिवसांत हार्ट अटॅकचा धोका संभावतो; परंतु रात्री ३ ते पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्याचा सर्वाधिक धोका असतो.नेमकं काय होतं?हिवाळ्यात थंड पाण्याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान प्रभावित होते. शिवाय, या दिवसांत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी, हृदयाला आवश्यक रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो आणि ‘हार्ट अटॅक’चा धोका संभोवतो.अशी घ्या सतर्कता

  • थंड पाणी पिण्याचे टाळा.
  • रात्रीच्या जेवणानंतर लगेच बाहेर जाणे टाळा.
  • शरीराचे तापमान संतुलित राखा.
  • नियमित व्यायाम करा.
  • मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करा.
  • ऊबदार वस्त्रे परिधान करा.
  • चरबीयुक्त पदार्थाचे सेवन टाळा.
  •  

थंडीच्या दिवसांत हृदयाला रक्त पुरवठा करणाºया रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. हिवाळ्यात हे प्रमाण वाढत असून, वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHeart Attackहृदयविकाराचा झटका