शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली: एक ठार

By admin | Updated: June 5, 2017 02:08 IST

वडाळी देशमुख येथे वादळी वा-यासह जोरदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी देशमुख : अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख परिसरात ४ जून रोजी वादळी वारा व गारांसह पाऊस झाला. त्यामध्ये मंदिराच्या बांधकामाची भिंत कोसळून एक जण ठार झाल्याची घटना शहापूर बृहत प्रकल्पाजवळ घडली. पावसामुळे गावातील घरात पाणी घुसले, तर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वडाळी देशमुख येथील विजय वारुळे हे शेतकरी शेतामधून परत येत असताना जोरदार पाऊस सुरू झाला व गारा पडू लागल्या. यावेळी पावसापासून बचाव करण्याकरिता धरणाच्या भिंतीजवळ बांधकाम सुरू असलेल्या मंदिराजवळ थांबले. यावेळी मंदिराची भिंत वार्‍यामुळे व पावसामुळे कोसळल्याने विजय वारुळे यांचा जागीच मृत्यू झाला.वादळी वार्‍यामुळे या परिसरातील झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या, घरावरील टिन हे पंख्यासह उडून गेले. नवीन प्लॉटमधील वस्तीत पाणी घुसल्याने तारांबळ उडाली. शिवाय, परिसरात असलेल्या केळी व कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस व वादळी वारा सुटल्याने तारा तुटल्या, त्यामुळे उशिरा रात्रीपर्यंंत येथील विद्युत पुरवठा खंडित होता. पावसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसामुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून, झालेल्या नुकसानीची माहिती पोलीस पाटील यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिली. शिवाय, अकोट तालुक्यातील काही गावात पाऊस पडला असून, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.या नुकसाना संदर्भात प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.