अकोला : राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीच्या नियमावलीनुसार, आगामी २० आणि २१ मे रोजी होणाऱ्या (एलएलबी) विधी प्रवेश परीक्षेचे केंद्र अकोल्यात दिले नसल्याने जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी २० आणि २१ मे रोजी अमरावतीला जावे लागणार आहे. अकोल्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.एकीकडे वाशिम, बुलडाणासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे परीक्षा केंद्र दिले गेले असून, अकोल्यास प्रवेश परीक्षा केंद्र देण्यात आले नाही. मागील वर्षापासून ह्यएलएलबी-लॉह्णचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्यसीईटीह्ण म्हणजे एन्ट्रन्स परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले. बारावीनंतर पाच वर्षे आणि पदवीनंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मागील वर्षी या नियमावलीमुळे अनेक विद्यार्थांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. शेवटी ज्या विद्यार्थ्यांनी केवळ एन्ट्रन्स अर्ज अपलोड केला, परीक्षेत अपात्र ठरलेत, अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला गेला; मात्र ज्यांनी सीईटीसाठी अर्ज दिला नाही, अशांना मात्र ह्यलॉह्णला अॅडमिशन नाकारले गेले. यंदादेखील ती वेळ येऊ नये म्हणून लॉ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला आहे. मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिलेले नाही. या तुलनेत वाशिम आणि बुलडाणा येथे केंद्र दिले आहेत. बुलडाणा आणि वाशिमच्या तुलनेत अकोल्यात लॉ कॉलेज जास्त असताना केंद्र का नाकारले गेले, हे अद्याप समजलेले नाही. विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. एवढे सारे असताना अकोल्यावर अन्याय का, असा प्रश्न शेकडो विद्यार्थ्यांकडून केला जातो आहे. पाच वर्षांचा लॉ कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची २० मे रोजी आणि तीन वर्षांचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची २१ मे रोजी परीक्षा घेतली जात आहे. या दोन्ही परीक्षा देण्यासाठी अकोल्यातून शेकडो विद्यार्थ्यांना अमरावतीत जावे लागणार आहे. एका विद्यार्थ्यास किमान चारशे रुपये खर्च अपेक्षित आहे. दोनशे विद्यार्थी जर गृहीत धरले, तरी ऐंशी हजार रुपयांचा खर्च अकोल्यातील विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. अकोल्यातील निष्क्रिय पुढाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हा भुर्दंड सोसावा लागतो आहे.विधी प्रवेश परीक्षेचे केंद्र अकोल्यात मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परीक्षेची वेळ काही दिवसांवर आलेली असतानादेखील अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. आमचा पाठपुरावा सुरू आहे.-अॅड. मोतीसिंह मोहता, ज्येष्ठ विधिज्ञ अकोला.
राजकीय पुढा-यांच्या निष्क्रियतेमुळे शेकडो विद्यार्थ्यांना भुर्दंड
By admin | Updated: May 13, 2017 05:04 IST