शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद मित्रांमुळे नवरदेवाने घोडा सोडून काढला पळ !

By admin | Updated: May 4, 2017 00:00 IST

वरातीत मद्यधुंद मित्रांनी घातला वाद : दुसऱ्या गटातील युवक आले अंगावर धावून

ऑनलाइन लोकमत

अकोला : दारू प्राशन केल्यामुळे अनेकांना सर्वशक्तिमान असल्याचा भास होतो आणि यातून अनर्थ घडतात. असाच एक हास्यास्पद प्रसंग बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास किल्ला चौकात घडला. आपल्या मित्रांच्या लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी झालेल्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्रांनी दुसऱ्या गटातील युवकांसोबत वाद घालल्याने, संतप्त युवक वरातीमधील मद्यधुंद युवकांवर चालून आल्यामुळे नवरदेवाला घोडा सोडून घरी पळ काढावा लागला. शिव नगरात राहणाऱ्या युवकाचा लग्न समारंभ असल्याने, बुधवारी रात्री नवरदेव झालेल्या युवकाची बुधवारी रात्री घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. लग्न हा आनंदाचा क्षण असल्याने, नवरदेवाच्या मित्रांनी चांगलीच दारू ढोसली आणि मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्यासाठी सहभागी झाले. रात्री दहा वाजल्याने जुने शहर पोलिसांनी किल्ला चौकात मिरवणूक अडवली आणि डीजे बंद करण्यास सांगितला. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील नवरदेवाचे मित्र नाराज झाले. त्यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घालली. नवरदेवाने त्यांची समजूत काढली; परंतु पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केल्याची खुमखुमी मद्यधुंद मित्रांमध्ये होतीच. त्यांनी चौकातील दुसऱ्या एका युवकाच्या गटासोबत वाद घातला. शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या गटातील युवकांनी आणखी युवकांना गोळा केले आणि मारहाण करण्याच्या उद्देशाने वरातीमधील मद्यधुंद युवकांच्या अंगावर चालून गेले. हाणामारीचा प्रसंग उद्भवला; परंतु नवरदेवाने या मद्यधुंद मित्रांमुळे आपल्याला विनाकारण मार खावा लागेल आणि पुन्हा हळद लावावी लागेल, लग्न राहील बाजूला आणि रुग्णालयात विनाकारण भरती व्हावे लागेल, असा विचार केला आणि या भानगडीत न पडता घोडा सोडून एका मित्राच्या मोटारसायकलवर घरी पळ काढला; परंतु चौकात पोलीस तैनात असल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही गटांतील वाद मिटविला.