शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

दुबार पेरणीचे सावट!

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

रिसरात झालेल्या वादळामुळे

सोनाळा : परिसरात झालेल्या वादळामुळे वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे सुमारे ४३५ हेक्टर बागायती क्षेत्रावर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याने अंकूर कोमेजत असून दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोनाळा व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळ झाले. या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील झाडे कोळमडून पडली. तसेच विजेचे खांब व त्यावरील तार तुटल्याने सोनाळा भाग १ व २, पिंगळी जहांगीर, बोरखेड शिवारातील शेती पंपाला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने चारशे पासष्ठ हेक्टर बागायती शेती प्रभावीत झाले आहे. पेरलेल्या कपाशीच्या बिजवाईचे अंकुर कोमेजण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. नैसर्गिक वातावरणातील पावसावर अवलंबून न राहता व कपाशीचे भरघोस घेण्याकरिता दरवर्षी सोनाळा परिसरातील सोनाळा, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, बावनबीर शिवारातील शेतकरी वर्ग मृग नक्षत्रात बागायती कपाशीची पेरणी करतात. यावर्षी ही परिसरातील शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात चारशे पासष्ठ हेक्टर बागायती क्षेत्रावर पेरणी केली आहे. यामध्ये काही शेतकर्‍यांच्या बागायती मधील कपाशी बिजवाई जमिनीवर निघाली तर काहीने अंकुर बाहेर काढले आहेत. ११ जून रोजी वादळाने थैमान घातले होते. परिसरातील शेतातील खांब तुटले तर काहीचे तारही तुटून पडले आहेत. यामुळे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती कपाशीला पाणी देणे बंद केले आहे. गेली चार दिवस उलटून गेली आहेत तरीही वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरु केला नाही. वादळी पावसाचा काही प्रमाणात जमिनीत ओलावा टिकून आहे तर वरुन सूर्यप्रकाश आग ओकत असल्याने पेरलेल्या बागायती कपाशीच्या बिजवाईचे तीन-तेरा वाजत असल्याचे चित्र सर्वदूर परिसरात आहे. बर्‍याच शेतकरीवर्गाने महागाईची बिजवाई पेरलेली असल्याने चांगले उत्पादन घेण्याची स्वप्ने धुळीत मिळत आहेत.