शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: June 30, 2014 01:26 IST

अकोला जिल्हय़ात टंचाई परिस्थिती: उपाययोजनांसाठी बोलावली बैठक.

संतोष येलकर / अकोलापाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून, जिल्हय़ात कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मान्सून लांबल्याने जिल्हय़ातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर उ पाययोजना करावयाच्या आकस्मिक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी येत्या ५ जुलै रोजी बैठक बोलावली आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात आहे; मात्र अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. पावसाने दडी मारल्याने जिल्हय़ात खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असली तरी, पेरणीयोग्य पाऊस बरसला नसल्याने जिल्हय़ात खरीप पेरण्यांना अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात अतवृष्टीमुळे मूग, उडिदाचे पीक बुडाले, तर यावर्षी मान्सून लांबल्याने पेरणीचा कालावधी निघून जात असल्याच्या स्थितीत यंदाही मूग, उडिदाचे पीक येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस नसल्याच्या परिस्थितीत खोळंबलेल्या पेरण्या आणि शे तीची कामे बंद असल्याने शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याची स्थिती आहे. यासोबतच जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ातही कमालीची घट होत असून, पाणीटंचाईचा प्रश्नही तीव्र होत आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास जिल्हय़ात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून, पावसाअभावी जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याचे चित्र आहे.मान्सून लांबल्याने गेल्या २७ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांची ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सह्ण घेऊन संभाव्य टंचाई परिस्थि ती हाताळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने मान्सून लांबल्यने जिल्हय़ातील संभाव्य टंचाई परिस्थिती व करावयाच्या आकस्मिक उ पाययोजनांसाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हय़ातील संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक बोलावली आहे. २२पावसाअभावी जिल्हय़ात रखडलेल्या खरीप पेरण्या, बियाणे व खतांचा साठा, पाणीटंचाईची स्थिती, जनावरांसाठी उपलब्ध चारा व इतर बाबींचा आढावा आणि टंचाई परिस्थितीवर करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.