अकोला : जिल्ह्यात गेल्या रविवारी झालेल्या अतवृष्टीचा अनेक घरांना तडाखा बसला असून, प्राथमिक अहवालानुसार अकोला तालुक्यात २३ घरांची पडझड झाली आहे.गेल्या रविवारी जिल्हाभरात मुसळधार पाऊस बरसला. तसेच मूर्तिजापूर तालुका वगळता सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांनाही पूर आला हो ता, या अतवृष्टीचा जिल्ह्यात अनेक घरांना तडाखा बसला असून, घरांच्या पडझडीमुळे नागरिकांचे नुकसान झाले. घरांच्या पडझडीबाबात अकोला तहसील कार्यालयामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात २३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. जिल्हय़ात अनेक घरांची पडझड झाली असली तरी, अकोला वगळता इतर तालुक्यातील घरांच्या नुकसानीबाबतचे प्राथमिक अहवाल अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नसल्याची स्थिती आहे.
अतवृष्टीमुळे अकोला तालुक्यात २३ घरांची पडझड
By admin | Updated: September 15, 2014 01:49 IST