शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सेसफंडाच्या निधी वाटपामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 13:03 IST

अकोला: बांधकाम समितीने सेसफंडातील ६ कोटी ५० लाख रुपयांतून २११ कामांना दिलेल्या मंजुरीच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ केला.

अकोला: बांधकाम समितीने सेसफंडातील ६ कोटी ५० लाख रुपयांतून २११ कामांना दिलेल्या मंजुरीच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ केला. सेसफंडातून कोणती कामे घेता येतात, यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली; मात्र त्यावर अखेरपर्यंतही चर्चा न होताच सभा संपल्याने सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे धाव घेतली. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, भाजप गटनेते रमण जैन यांच्यासह सदस्यांचा समावेश होता.जिल्हा परिषद उपकराचे (सेस) ९ कोटी १७ लाखही अखर्चित असल्याने सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचा विचार करता पदाधिकाऱ्यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत कामांच्या यादीला मंजुरी दिली. ती यादी माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आली. सभेत सुरुवातीलाच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्र इमारत बांधकामासाठी २ कोटी ४६ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून देण्याच्या ठरावावर सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक फैरी झडल्या. सेसफंडातील ६ कोटी ५० रुपये खर्चातून २१३ कामांना मंजुरी दिली. त्यातूनच डीपीआरसीसाठी निधी देण्याचा आग्रह देशमुख यांनी लावून धरला. तर त्यासाठी वेगळी तरतूद केली जाईल, असे अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सांगितले. त्यासोबतच यादीतील ज्या २१३ कामांसाठी निधी देण्यात आला. त्यावर चर्चा करण्याची मागणी शिवसेनेचे सदस्य नितीन देशमुख यांनी सुरुवातीपासूनच लावून धरली. गटनेते रमण जैन यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत मागणी लावून धरली. सोबतीला शिवसेना-भाजप सदस्यही असल्याने सभेत चांगलाच गदारोळ झाला. सेसफंडातून अंतर्गत रस्त्यांची कामे घेता येतात का, असा सवालही सातत्याने त्यांनी उपस्थित केला. या विषयावर नंतर चर्चा करण्याचे सांगत इतर ठराव मांडण्याचे निर्देश अध्यक्षांनी सचिव विलास खिल्लारे यांना दिले. त्यामुळे विषय सूचीतील चार ठराव मंजूर करत वेळेवरच्या विषयांवर चर्चा झाली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद