शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांच्या स्थलांतरावरही दुष्काळाचा परिणाम !

By admin | Updated: December 27, 2014 23:52 IST

अपु-या पावसामुळे बार हेडेड गीज विदर्भात आढळला नाही.

दिवाकर इंगोले/ कारंजा लाड:बदलत्या ऋतुमानानुसार पक्षी त्यांना पोषक अशा वातावरणाचा शोध घेत स्थलांतर करीत असतात; परंतु ज्या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करतात त्या ठिकाणच्या वातावरणात विविध कारणांनी वेळेपूर्वीच बदल झाला असेल, तर त्याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावरही होत असल्याचे या संदर्भात पक्षीमित्रांनी केलेल्या निरीक्षणावरून आढळून आले आहे.विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध प्रजातीचे पक्षी विदर्भात येत असतात. सैबेरिया, श्रीलंका यासारख्या देशातून ब्लॅकटेल्ड, गॉडबिट, स्पॉटेड रेड शँॅक, इगल, कॉमन टिल, शॉवेलर, ब्ल्यू विंग टेल, बार हेडेड गीज (राजहंस), गार्डन बर्डस आदी पक्ष्यांचा यामध्ये समावेश असतो. रेड श्ॉॅक हा पक्षी युरोपमधून सुमारे आठ हजार किलोमीटरचे अंतर कापून कारंजा तालुक्यात येतो, तर शॉवेलर हा पक्षी सैबेरियातून पाच हजार किलोमीटर अंतरावरून येथे येतो; परंतु यावेळी विदर्भात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, अनेक जलाशयातील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात घटली, तर कित्येक जलाशय कोरडे ठण्ण पडले आहेत. उथळ पाण्याच्या ठिकाणी मिळणार्‍या अन्नभक्ष्यावर जगणारे पक्षी, यावेळी या भागात पाहायला मिळाले; परंतु इतर महत्त्वपूर्ण अनेक पक्ष्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. अपुर्‍या पावसामुळे बार हेडेड गीज (राजहंस) हा पक्षी विदर्भात आढळला नाही. हा पक्षी प्रामुख्याने रब्बीच्या हंगामात येणार्‍या पिकांवर ताव मारण्यासाठी विदर्भात येतो; परंतु यावर्षी रब्बी हंगामही बेताचाच असल्याने हा पक्षी या भागात दिसून आला नाही. अफगाणिस्तानातून पाच हजार किलोमीटरचे अंतर कापून येणारा गार्डन बर्डस् हा पक्षी २00२ नंतर प्रथमच या भागात आढळून आला. त्याशिवाय पलाशगल हा पक्षी एका तपानंतर प्रथमच या भागात दिसला. हवामानाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर दिसत आहे. अडाण धरणावर केवळ ६ राजहंस पाहायला मिळाले. गत वर्षी ही संख्या ४७ होती. हजारोच्या संख्येने विदर्भात स्थलांतर करणारे आणि मेघदूतच्या महाकाव्यात उल्लेख असणारे चक्रवाक बदक पन्नासच्या जवळपासच आढळले असल्याचे पक्षीमित्र कौस्तुभ पांढरीपांडे यांनी नमूद केले.